महाराष्ट्र

सांगोला विद्यामंदिर स्नेहसंमेलन ; विविध गुणदर्शन सादरीकरणाने जिंकली उपस्थितांची मने

सांगोला ( प्रतिनिधी) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज वार्षिक स्नेहसंमेलन २०२४- २५ रविवार दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी दुपार सत्रामध्ये प्रशाला विविध गुणदर्शन सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
सकाळी प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला.त्यानंतर संगीत फिशपॉंडस,फिशपॉंडस अर्थात शेलापागोटे या कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांना मनमुराद आनंद घेतला.शेला पागोट्याने हसता- हसता काहींचा आत्मगौरव झाला तर काहींना आत्मभानही आले.

सकाळी १०.०० वा. संस्थापक अध्यक्ष कै.गुरूवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला व वाहतूक निरीक्षक सांगोला आगार सागर कदम फनफेअर,संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके विज्ञान प्रदर्शन, सौ.राही विश्वेश झपके कला प्रदर्शन,जि.प.प्रा.शाळा.नं.३ मुख्याध्यापिका जुबेन शेख यांचे हस्ते रांगोळी प्रदर्शन उद्घाटन झाले.यावेळी संस्थासचिव मल्लिकार्जुन घोंगडे,संस्था खजिनदार शंकरराव सावंत,संस्था सदस्य ॲड विजयसिंह चव्हाण व प्रशासकीय अधिकारी यांची उपस्थिती होती.
दुपार सत्र प्रशाला विविध गुणदर्शन उद्घाटन परीक्षक प्रशांत मिसाळ यांचे हस्ते नटराज पूजन व श्रीफळ वाढवून झाले.

यावेळी परीक्षक निरंजन केंगार यांचे हस्ते बापूसाहेब झपके व परीक्षक कु.मृणाल राऊत यांचे हस्ते कै.बाईसाहेब झपके यांच्या प्रतिमेस पुष्पहार समर्पित करण्यात आला. त्यानतर संपन्न झालेल्या विविध गुणदर्शनामध्ये वैयक्तिक नृत्य, लावणी, रिमिक्स व सामूहिक नृत्यामध्ये गोंधळ गीत, साऊथ इंडियन रिमिक्स,तामिळ, देशभक्तीपर गीत,नाटीका, महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारी गीते,कृष्णा थीम तसेच विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला या २०० पेक्षा जास्त विद्यार्थी सहभाग असलेल्या गीतातून कै.गुरूवर्य बापूसाहेब झपके,कै.बाईसाहेब झपके, प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या कार्याचा गौरव झाला.सर्व गीत प्रकार सदरीकरणानी आस्वादकांची मने जिंकली.

या बहारदार कार्यक्रमाच्या आस्वादनासाठी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके ,सौ.राही झपके, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापिका शहिदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे,पर्यवेक्षक सुरेश मस्तुद, प्रदीप धुकटे ,मच्छिंद्र इंगोले,प्रशाला स्नेहसंमेलन प्रमुख बापूसो सावंत,ज्यूनिअर कॉलेज स्नेहसंमेलन प्रमुख प्रा.तानसिंग माळी, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रशाला नागेश भोसले, ज्युनिअर कॉलेज प्रमुख प्रा.सुप्रिया गायकवाड, यांचेसह सर्व विभाग प्रमुख व विभागतील शिक्षक, तसेच शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.

 

वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये विविध स्पर्धांमधील सहभागाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो.तसेच स्नेहसंमेलन विविध पदांसाठी झालेली निवडणूक विद्यार्थ्यांना लोकशाहीचे धडे देऊन जाते, विज्ञान,कला, रांगोळी प्रदर्शनामधील सहभाग त्यांच्यासाठी कौशल्य निर्माण करणारा आहे.
*विश्वेश झपके.*
*उद्घाटक विज्ञान प्रदर्शन*
*कार्य.सदस्य सां.ता.शि.प्र मंडळ, सांगोला*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button