शाळा-कॉलेजमधील संस्कारामुळेच चमकले अनेक खेळाडू – सचिन खिलारी
सांगोला विद्यामंदिर वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
सांगोला ( प्रतिनिधी )प्रत्येक व्यक्तीला त्याच्या शाळेतूनआणि महाविद्यालयीन जीवनात योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाले तर त्याची भावी वाटचाल ही योग्य दिशेने होते.सांगोला विद्यामंदिरमधून मिळणारे संस्कार,शिकवण तुम्हालाही नक्कीच खेळासह इतर क्षेत्रांमध्ये संधी देणारी आहे.यासाठी फक्त तुमची मेहनत महत्वपूर्ण आहे असे प्रतिपादन पॅरिस पॅरालिम्पिकमधील रौप्य पदक विजेते सचिन खिलारी यांनी केले
सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभाच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष व सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके , संस्था सचिव म.शं. घोंगडे, संस्था खजिनदार शंकरराव सावंत,संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके, संस्था सदस्य दिगंबर जगताप,प्राचार्य अमोल गायकवाड उपमुख्याध्यापिका शहिदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक सुरेश मस्तुद प्रदीप धुकटे, मच्छिंद्र इंगोले, सर्वोत्कृष्ट विद्यार्थी,पालक, उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके व बाईसाहेब झपके यांच्या प्रतिमेस प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला.प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.धनाजी चव्हाण यांनी करून दिला.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील अहवालाचे वाचन उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे यांनी केले.प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सर्वोत्तम विद्यार्थी निवड अहवालाचे वाचन उन्मेश आटपाडीकर यांनी केले.यानुसार प्रशालेचा सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून समृद्धी संजय भोसले (इ.१० वी ) तर ज्युनिअर कॉलेजमधून वैभवी राजकुमार रोडगे ( इ.१२ वी ) यांची निवड झाल्याबद्दल पालकांसमवेत प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते चांदीचे पदक , प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आला. तसेच ऋतिक सराटे, कोयल मोरे,
यांचा एन.सी.सी.बेस्ट कॅडेट, वेदांत काळेल स्काऊट बेस्ट कॅडेट व भक्ती काशीद गाईड बेस्ट कॅडेट म्हणून सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
पुढे बोलताना प्रमुख पाहुणे खिलारी यांनी विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद घेत आपली पॅरालिम्पिकमधील यशोगाथा सांगितली.राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये मिळविलेले यश,त्यासाठी घेतलेली मेहनत,शिक्षकांचे मिळालेले योग्य मार्गदर्शन,यश मिळाल्यानंतर राज्य सरकार, भारत सरकारकडून मिळालेली बक्षिसे, मिळालेल्या सुविधा, मिळालेला सन्मान विद्यार्थ्यांना सांगत खेळाविषयी आदर निर्माण केला.तसेच काही मिळवण्यासाठी त्याग करा,संस्कारशील व्हा,मोबाईलचा वापर सजगपणे करा, शिक्षकांचा आदर करा, कोणत्याही क्षेत्रात टॉपला कार्यरत रहा असे मौलिक प्रबोधन केले.
यावेळी शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४ मधील वर्षभरातील, विविध विभागातील स्पर्धेमध्ये पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशुद्धचंद्र झपके यांचे उपस्थितत बक्षिस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यासंदर्भातील निवेदन वैभव कोठावळे,चैतन्य कांबळे,प्रा.प्रसाद खडतरे यांनी केले. या पारितोषिक वितरण समारंभासाठी सेवानिवृत्त प्राचार्य, उपमुख्याध्यापक, उपप्राचार्य,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,पालक, गावातील नागरिक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य अमोल गायकवाड यांनी संस्थापक अध्यक्ष कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांचे सांगोला विद्यामंदिरच्या स्थापनेतील महत्त्वपूर्ण योगदान, उदात्त हेतू विशद करत, स्नेहसंमेलन कार्यक्रमाची माहिती दिली व उपस्थितांचे स्वागत केले. सूत्रसंचालन उन्मेश आटपाडीकर यांनी केले तर उपमुख्याध्यापिका शहिदा सय्यद यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या पारितोषिक वितरण समारंभाचे वेगळेपण म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरील रौप्य पदक विजेते खेळाडू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत.आणि ते यशस्वी विद्यार्थी म्हणून कौतुक करत तुम्हाला पारितोषिक देत आहेत हे खूप प्रेरणादायी आहे. कष्टाशिवाय पर्याय नाही. कष्टातूनच फळ आणि मानसन्मान मिळेल. ‘ध्येयापासून विचलित होऊ नका’.जिद्दीने प्रयत्न करा तुमच्या प्रगतीसाठी संस्था, शाळा सदैव तत्पर आहे ..
*प्रशुद्धचंद्र झपके (संस्था सहसचिव)*
*कार्यक्रमाचे अध्यक्ष*