ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख यांच्या निधनाने शेकापची मोठी हानी ~डॉ बाबासाहेब देशमुख

सांगोला खरेदी विक्री संघाचे माजी व्हा शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते विलास देशमुख सर व आबासाहेब यांनी सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले तसेच खरीद विक्री संघाचे ३५ वर्षे व्हाईस चेअरमन व दोन वर्षे चेअरमन पदाचे काम करून जनसामान्यात प्रतिमा उंचावण्याचे काम देशमुख सरांनी केले व त्यांच्या अकाली निधनाने शेतकरी कामगार पक्षाची फार मोठी हानी झाली आहे असे मत डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी कोळे ता. सांगोला येथे वि.मा. देशमुख सरांच्या तिसऱ्या दिवसाच्या श्रद्धांजली कार्यक्रमात व्यक्त केले.
वि.मा. देशमुख सर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते व महादेव मंदिराचा जिर्णोद्धार त्यांच्यामुळेच झाला व त्यांचे आकस्मित जाणे म्हणजे पुण्याचे काम आहे असे मत माजी सभापती संभाजी तात्या आलदर यांनी शोकसभेत व्यक्त केले. हर हर महादेव ग्रुप च्या वतीने देशमुख सरांचा संवाद सर्वांबरोबर होत होता व कोरेगाव चे चांगले नेतृत्व हरपले असे शिक्षक नेते फिरोज आतार यांनी शोक सभेत सांगितले. तसेच राष्ट्रवादीचे नेते यशराज साळुंखे पाटील, तानाजी काका पाटील, युवा नेते श्रीकांत दादा देशमुख, उल्हास धायगुडे, चेअरमन अरुण आबा घेरडे माजी प्राचार्य सुबराव बंडगर, शिवाजी कोळेकर, हातीद गावची माळी सर, माझी जे प सदस्य गजेंद्र कोळेकर, चेअरमन भिकाजी बाबर, इमडे सर, प्रा. मारुती सरगर, मा. शेकाप सचिव विठ्ठलराव शिंदे सर, माजी सरपंच अरुण बजबळकर, वलेकरसर, मीनल कोळेकर मॅडम इत्यादींनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहून मनोगत व्यक्त केले.
गुरुवर्य बापूसाहेब झपके यांनी विमा सरांना नोकरीसाठी मराठवाड्यात न जाऊ देता कोळा विद्यामंदिर येथे शिक्षक म्हणून घेतले व हायस्कूलचे रोपटे उभा केले आज त्याचा वेलू गगनावर गेला आहे परंतु पराधीन आहे पुत्र मानवाचा याप्रमाणे श्रद्धांजली वाहताना दुःख होत आहे असे माजी केंद्रप्रमुख शिवाजी करांडे गुरुजी यांनी शोकसभेत सांगितले. यावेळी शेतकरी, व्यापारी, शिक्षक, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ असे सर्व स्तरातील नागरिक उपस्थित होते शेवटी पसायदानाने शोक सभा संपन्न झाली.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक भाऊ शिंदे चिटणीस दादा शेठ बाबर माजी चिटणीस विठ्ठलराव शिंदे नारायण तात्या पाटील शहाजी नलवडे भिकाजी बाबर पिंटू बंडगर उद्योगपती शिवाजीराव होनमाने संगम आप्पा धांडोरे कमल भाई तांबोळी सूर्यकांत घाडगे माजी प्राचार्य वसंत मोहिते डॉक्टर रावसाहेब देशमुख वसंतराव होनमाने नारायण जगताप हिंदुराव घाडगे अरविंद पाटील भारत खरात यांच्यासह कोळा पंचक्रोशीतील सर्व नेतेमंडळी पदाधिकारी ग्रामस्थ सर्व ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच संचालक नेते मंडळी संपूर्ण देशमुख कुटुंबीय विलासराव देशमुख सर परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.