सांगोला तालुक्यातील गौडवाडी गावचा डाळिंब उत्पादनाचा पॅटर्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी- जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद
सांगोला तालुक्यातील गौडवाडी येथे कृषी विभागाच्या व गौडवाडी येथिल डाळिंब उत्पादक शेतकरी यांचे वतीने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी शाश्वत व निर्यातक्षम डाळींब उत्पादन कार्यशाळा व प्रक्षेत्र भेट संपन्न झाली . ह्या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून श्री कुमार आशीर्वाद सर यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी ते बोलताना म्हणाले की सोलापूर जिल्हा अवर्षण प्रवणग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील भूजल पातळीचा व उपलब्ध पाण्याचा विचार करता उसासारख्या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल राहिल्यास भविष्यात जल संकट वाढवू शकते तेव्हा या सर्व गोष्टीचा विचार करून शेतकरी बांधवांनी कमी पाण्यावर अधिक उत्पादन देणाऱ्या डाळिंब या पर्यायी पिकाकडे वळणे आवश्यक आहे. तसेच गौडवाडी डाळिंब उत्पादनाचा पॅटर्न हा फक्त तालुक्यापुरता मर्यादित न राहता तो जिल्ह्यासाठी इतर शेतकऱ्यांना ही प्रेरणादायी , मार्गदर्शक ठरावा व शेतकऱ्यांनी त्याचा अवलंब करावा असे आपल्या भाषणात बोलताना ते म्हणाले तसेच उपस्थित शेतकऱ्यांच्या मागणीनुसार डाळिंब पिकाला आवश्यक क्रॉपकव्हरच्या अनुदानासाठी तसेच बायोगॕस युनिट अनुदानासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. डाळिंब निर्यातीमधील आडचणी तसेच डाळिंब भौगोलिक मानांकनाचा वापर याबाबत पाठपुरावा करू असे सांगितले.
जिल्हाधिकारी यांनी आण्णा गडदे व नाना माळी यांचे निर्यातक्षम डाळिंब प्लाॕटची पाहणी केली व समाधान व्यक्त करून अडचणी समजुन घेतल्या.
सदर कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री दत्तात्रय गवसाने जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सोलापूर , डॉ.राजीव मराठे संचालक राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर, डाळिंब महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे काका,सौ शितल चव्हाण प्रकल्प संचालक संचालक आत्मा सोलापूर, श्री मदन मुकणे कृषी उप संचालक स्मार्ट सोलापूर, श्री संतोष कणसे तहसीलदार सांगोला, श्री बाळासाहेब लांडगे उपविभागीय कृषी अधिकारी पंढरपूर ,
डॉ संग्राम धुमाळ वरिष्ठ संशोधक शास्त्रज्ञ राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर ,डॉ.सोमनाथ पोखरे शास्त्रज्ञ राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर, डॉ.प्रशांत कुंभार प्राध्यापक उमा ज्युनिअर कॉलेज मोडनिंब, तालुका कृषि अधिकारी पंढरपूर श्री सुर्यकांत मोरे , श्री प्रवीण माने प्रगतशील डाळिंब बागायतदार, कृषि विभागाचा स्टाॕफ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या कार्यशाळेसाठी उपस्थित डॉ.राजीव मराठे यांनी जिल्हा पातळीवर निरोगी व सशक्त अशा डाळिंब कलमासाठी प्रमाणित रोपवाटिका स्थापन करणार असल्याचे सांगितले तसेच प्राध्यापक कुंभार सर यांनी डाळिंबातील एक खोड लागवड तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले व उपस्थित शेतकऱ्यांना या तंत्रज्ञाचा अवलंब करण्याचे त्यांनी आवाहन केले .राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राची वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.धुमाळ सर यांनी डाळिंबाच्या निरोगी रोपांची निवड व त्याचे महत्त्व ,.डॉ. पोखरे सर यांनी डाळिंबावरील तेलकट रोग व्यवस्थापन मर रोग व्यवस्थापन ,सुत्रकृमी व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले.
सदर कार्यशाळेसाठी आटपाडी मंगळवेढा पंढरपूर माळशिरस जत आधी भागातील डाळिंब उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यशाळेचे प्रस्ताविक श्री शिवाजी शिंदे तालुका कृषी अधिकारी सांगोला यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार श्री श्रीधर शेजवळ कृषी पर्यवेक्षक यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करणेसाठी गुरूकृपा शेतकरी गटाचे सदस्य नाना माळी, आण्णा गडदे , कल्लापा गडदे, शिवाजी हिप्परकर आदींनी परिश्रम घेतले.