sangola

न्यू इंग्लिश स्कूल चे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश

HTML img Tag Simply Easy Learning    

 पंचायत समिती (शिक्षण विभाग) सांगोला व सांगोला तालुका इंग्रजी अध्यापक मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि कॅालेज च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त करून जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड झाली याबद्दल प्रशालेच्या प्रांगणात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला.

 

यावेळी व्यासपीठावर न्यू इंग्लिश स्कूल चे प्राचार्य प्रा.केशव माने,उपमुख्याध्यापक प्रा.संजय शिंगाडे,पर्यवेक्षक तानाजी सूर्यगंध,पर्यवेक्षक दशरथ जाधव व पर्यवेक्षक तात्यासाहेब इमडे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरूवातीला सांस्कृतिक प्रमुख स्मिता इंगोले मॅडम यांनी प्रास्ताविक करताना गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाची माहिती सांगितली.

तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत इयत्ता पाचवी ते सहावी च्या गटात प्रशालेतील इयत्ता पाचवी मधील अनुज अनिल आदलिंगे याने तालुक्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर विराज विशाल शिनगारे उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला. इयत्ता सातवी ते आठवी च्या गटात इयत्ता सातवी मधील श्रावणी विष्णू माळी हिने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला तर उत्तेजनार्थ क्रमांक संग्राम मोहन बनकर याने प्राप्त केला.इयत्ता नववी ते दहावीच्या गटात समृद्धी विष्णू माळी हिने तालुक्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला.या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

 

त्याचबरोबर सदरच्या विद्यार्थांना मार्गदर्शन करणारे प्रशालेतील इंग्रजी विषयाचे शिक्षक दशरथ जाधव सर,श्रीरंग बंडगर सर,कोमल भंडारे मॅडम,स्मिता देशमुख मॅडम,वसंत आलदर सर,व दिप्ती कुलकर्णी मॅडम यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला.

सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चैतन्य फुले सर यांनी केले तर आभार कोमल भंडारे मॅडम यांनी मानले.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!