सांगोला – सांगोला शहरातील सर्व भाविक भक्तांना कळविण्यात आनंद होतो की हिंदू धर्मातला पवित्र श्रावण महिना सोमवार दिनांक ५-८-२०२४ पासून सुरू होत आहे त्यानिमित्ताने सांगोला शहरातून श्रावण दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे .सदर दिंडी दररोज सकाळी ६ वाजता श्री विठ्ठल मंदिर कोष्टी गल्ली येथून निघेल
श्रावण दिंडीचा प्रदक्षिणामार्ग:- विठ्ठल मंदिर कोष्टी गल्ली, सांगोला येथून बरोबर सहा वाजता निघून छत्रपती शिवाजी महाराज चौक, हनुमान मंदिर ,मनेरी गल्ली,श्री संत डेबोजी चौक ( परीट गल्ली ), शनि गल्ली, महादेव गल्ली, श्रीराम मंदिर, श्री दत्त मंदिर, मार्गे विठ्ठल मंदिर कोष्टी गल्लीपर्यंत समाप्त होईल.
सदर दिंडीमध्ये ज्या कोणा भाविकाला सहभाग घ्यावयाचा आहे, त्यांनी बरोबर ६ वाजता कोष्टी गल्ली येथील विठ्ठल मंदिरात दररोज हजर रहावे, ही विनंती, असे आवाहन श्री विठ्ठल पुरुष भजनी मंडळ कोष्टी गल्ली सांगोला यांनी केले आहे.