*घेरडी येथे अहिल्यादेवी जयंती निमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न.*

प्राध्यापक आर वाय घुटुकडे व इंजिनीयर रामचंद्र घुटूकडे ,समाजसेवक परमेश्वर गेजगे यांच्या संकल्पनेतून घेरडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 या जयंतीनिमित्त घेरडी येथे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेले होत्या.या वक्तृत्व स्पर्धेमध्ये जत ,सांगोला घेरडी, पाच्छापूर येथून असंख्य स्पर्धक आलेले होते.
स्पर्धेतील प्रमुख विषय थोर महापुरुष, पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर व सध्याच्या राजकारणातील स्थिती अशा विषयावर ही स्पर्धा आयोजित केलेली होती. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्य सरचिटणीस सोमा उर्फ आबा मोटे यांचे कडून पाच हजार एक रुपये, त्याचबरोबर जनार्दन अठराबुध्दे घेरडी गावचे माजी सरपंच बिरा पुकळे यांचे कडून तीन हजार एक रुपये त्याचबरोबर यमगर सर यांचे कडून 1001 त्याचबरोबर श्रीनिवास करे युवा नेते यांचे कडून 1001 लक्ष्यमंगल साडी सेंटर यांचे कडून 1001 जाहीर करण्यात आली होती.
सदर स्पर्धेमध्ये सुशांत वाघमोडे जत,प्रथम क्रमांक, घेरडी येथील कुमारी मृदुला मारुती खरात द्वितीय क्रमांक स्नेहल जानकर सांगोला तृतीय क्रमांक चतुर्थ क्रमांक निवेदिता गावडे उत्तेजनार्थ सक्षम जगधने, प्रणव चंदनशिवे ,राजवर्धन घोंगडे, साक्षी गेजगे, संचिता घुटुकडे यांनाही आकर्षक बक्षीस देण्यात आली या स्पर्धेच्या निमित्ताने गावातील सर्व आजी माजी सरपंच उपसरपंच सर्व संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते सदर स्पर्धेचे परीक्षक म्हणून वाघमोडे सर यांनी काम पाहिले.