महाराष्ट्र

शिक्षणाचे अंतिम ध्येय म्हणजे चांगला माणूस घडवणे – सुरेश पवार गुरुजी.

सांगोला: वर्षभरातील चांगल्या कामाची पावती कौतुकाची थाप व पुढील वर्षी  चांगले काम आपल्या हातून घडून यावे म्हणून दिलेले प्रोत्साहन म्हणजे बक्षीस समारंभ असतो असे मत सुरेश पवार सर यांनी  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की आयुष्यात पुढे जायचे असेल तर ध्येय निश्चित करा, प्रयत्नाने पुढे जा, जे स्वप्न पाहणार आहात त्या दृष्टीने वाटचाल करा,ध्येय वेडे व्हा, चांगला माणूस म्हणून घडा हे सर्व  व्यक्त करत असताना विद्यार्थ्यांना त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व साने गुरुजी यांच्या कथेतून मुलांना माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानच्या उत्कर्ष माध्यमिक विद्यालयाच्या  दि. 21/02/2025 रोजी झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिला.
या पारितोषिक वितरणाच्या समारंभासाठी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे माननीय श्री सुरेश पवार सर विद्यालयातील सृष्टी,परिणीती व शौर्य यांचे आजी आजोबा श्री विलास नलवडे व आजी शिलावती नलवडे संस्थेच्या कोषाध्यक्ष शालिनीताई कुलकर्णी ,पूर्व प्राथमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका शालन ताई गयाळी, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका विश्रांती ताई मागाडे,  माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सुनील कुलकर्णी सर ,माजी शिक्षिका धनश्री बाई देशपांडे, उच्च माध्यमिक विभागाचे मार्गदर्शक राजेंद्र ठोंबरे सर, पर्यवेक्षक प्रशांत भोसले सर , मुक्तानंद मिसाळ सर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली.उत्कर्ष विद्यालयातील गंधर्व कुलातील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन कार्यक्रमाची वातावरण निर्मिती केली.त्यानंतर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून विद्यालयांमध्ये घेत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती मुख्याध्यापक सुनिल कुलकर्णी सर यांनी करून दिली . प्रमुख पाहुण्यांचा परिचय शुभांगी कवठेकर मॅडम यांनी करून दिला.तसेच वर्षभरातील घेण्यात आलेल्या स्पर्धांचे बक्षीस वाचन प्रशांत भोसले सर व संचित राऊत  सर यांनी केले. वर्षभरातील  विद्यार्थ्यांचे निरीक्षण करून या कार्यक्रमांमध्ये काही विशेष बक्षिसे देण्यात आले त्यामध्ये स्कॉलरशिप परीक्षेमध्ये वेदांगी शिंदे, शास्त्रीय गायन यामध्ये प्रसाद काशीद,चित्रकला अक्षरा सुतकर व अनुष्का भंडारे,शांत व सुस्वाभावी म्हणून श्रुती नवले व वैदेही देशपांडे, तसेच पैलूदार विद्यार्थी म्हणून सोहम पाटणे व आदर्श वर्ग म्हणून इयत्ता सातवी ध्रुववर्गाची निवड करण्यात आली. या कार्यक्रमात आजोबा म्हणून लाभलेल्या नलवडे गुरुजींनी मुलांना दिलेल्या ज्ञानाचा योग्य वापर करा व स्वतःवर विश्वास ठेवा असा मोलाचा संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयेशा मुलाणी मॅडम यांनी केले तर आभार  मुक्तानंद मिसाळ सर यांनी मानले.
 वरील कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सांस्कृतिक विभाग प्रमुख रेश्मा सर्वगोड , स्पर्धा विभाग प्रमुख रेखा भिंगार्डे , शुभांगी कवठेकर, शिक्षक वृंद या सर्वांचे उत्कृष्टरित्या सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button