भाई जयंत पाटील यांची सरचिटणिस पदी तर  डाॅ.भाई बाबासाहेब‌ देशमुख यांची प्रदेशाध्यक्ष पदी  निवड

भारतीय शेतकरी कामगार‌ पक्षाचे १९ वे अधिवेशन पंढरपुर नगरीत भाई संपतबापु पवार -पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  संपन्न झाले.या अधिवेशनामध्ये राजकीय ठराव संमत मांडुन त्यास एकमताने सहमती घेण्यात आली‌.तसेच काही प्रासंगिक ठरावही मांडुन त्यास सहमती घेण्यात आली.सदर अधिवेशनामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या व पक्षांतर्गत विविध आघाड्यावर काम करणाऱ्या महत्त्वपुर्ण आशा पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या .

शेतकरी कामगार पक्षांमध्ये आसलेले‌ महत्वाचे पद म्हणजे सरचिटणिस पद या पदावरती पुंन्हच्छ भाई जयंत पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली .व शेतकरी कामगार पक्षाचे महत्वाचे असलेले पद म्हणजे पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पद या पदावरती दुसऱ्यांदा डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांची निवड करण्यात आली‌..तसेच कोल्हापुरचे भाई संपतबापु पाटील यांचे चिरंजीव भाई क्रांतिसींह पवार -पाटील या़ची एकमताने निवड संपन्न झाली.

  निवड झालेले पदाधिकारी  पुरोगामी विचार राज्यभर पोहचवण्याचे काम करतील असा विश्वास निवड समितीने व्यक्त केला.येणाऱ्या विधानसभेला या निवडीचा फायदा शेतकरी कामगार पक्षाला होईल.भाई जयंत पाटील व भाई बाबासाहेब देशमुख यांच्या निवडीने शेतकरी कामगार पक्षात नवचैतन्य निर्माण झाले आहे असे प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button