सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे रवींद्रनाथ टागोर यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथे बुधवार दिनांक ७ ऑगस्ट २०२४ रोजी ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता अकरावी व बारावी गटासाठी भावगीत, भक्तीगीत, देशभक्ती गीत व लोकगीत या गीतगायन स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. यावेळी व्यासपीठावर सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संस्थेचे सचिव म.शं. घोंगडे, प्राचार्य अमोल गायकवाड उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, वाङमय विभाग प्रमुख प्रा. शिवशंकर तटाळे, उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रतिमेला व संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास प्राचार्य अमोल गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला. या स्पर्धेमध्ये इयत्ता अकरावी व बारावी गटामध्ये ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थी- विद्यार्थिंनी मोठ्या संख्येने सहभागी झाले व उत्साहात भावगीत, भक्तीगीत, देशभक्तीपर, लोकगीताचे गायन केले.
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य अमोल गायकवाड यांनी रवींद्रनाथ टागोर यांचे साहित्यिक कार्य तसेच जगप्रसिद्ध विलक्षण प्रतिभेचे कवी म्हणून वेगळेपण सांगत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणे या हेतूने स्पर्धेचे आयोजन केले होते असे सांगितले व स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांच्या प्रतिसादासाठी आनंद व्यक्त केला.व गीतगायन करताना विद्यार्थ्यांनी ताल,लयबद्धता याकडे लक्ष द्यावे.असे सांगत कोणत्याही कलेत परिपूर्ण होण्यासाठी ध्यास व सराव करणे आवश्यक आहे हे पटवून देताना लता मंगेशकर यांचे उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.शिवशंकर तटाळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सुऱ्याबा आलदर यांनी केले तर प्रा.महेर ढवळे यांनी आभार प्रदर्शन केले. सदर स्पर्धेचे परीक्षण प्रा.इसाक मुल्ला,प्रा.सुप्रिया गायकवाड,प्रा.माधुरी शिंदे यांनी केले. यामध्ये भावगीतामध्ये पूनम आनंद सोनार ११वी शास्त्र क प्रथम क्रमांक,अनुष्का संजय गायकवाड १२ वी शास्त्र ब द्वितीय कमांक, ऋतुजा तानाजी टाकळे ११वी शास्त्र ब तृतीय क्रमांक, भक्तीगीत सिध्देश्वरी प्रमोद सुतार ११वी शास्त्र ब प्रथम क्रमांक, संचिता तानाजी दबडे ११वी शास्त्र क द्वितीय क्रमांक,आदित्य आप्पासाहेब भोसले ११वी वाणिज्य तृतीय क्रमांक,देशभक्तीपर गीत अनुष्का संजय गायकवाड १२ वी शास्त्र ब प्रथम क्रमांक,महेश दगडू हजारे ११वी संयुक्त द्वितीय क्रमांक,प्रणाली दत्तात्रय येलपले ११वी शास्त्र ब तृतीय क्रमांक,लोकगीत संचिता तानाजी दबडे ११वी शास्त्र क प्रथम क्रमांक, गुरूनाथ संतोष व्हटे १२वी शास्त्र ब द्वितीय क्रमांक,दिपाली मोहन भोसले ११वी शास्त्र क हिने तृतीय क्रमांक मिळविला.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके, सर्व संस्था कार्यकारिणी सदस्य, प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापक शहिदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे,पर्यवेक्षक सुरेश मस्तुद, प्रदीप धुकटे,मच्छिंद्र इंगोले शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले..