सांगोला पोलिस स्टेशन मधील ११ पोलीस कर्मचाऱ्यांची बदली

सांगोला (प्रतिनिधी) सांगोला पोलीस स्टेशन येथे शासकीय सेवेचा कार्यकाल पूर्ण केल्याने ८ पोलीस कर्मचाऱ्यांसह तीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या विनंतीनुसार बदली झाली आहे तर सोलापूर जिल्ह्यातील इतर पोलीस स्टेशन येथून १३ पोलीस अधिकारी, कर्मचारी सांगोला पोलीस स्टेशन येथे नव्याने बदलून आले आहेत. बदली झालेले व विनंती केलेल्या तीन पोलीस कर्मचारी यांना ३१ जुलै रोजी संबंधित पोलीस स्टेशनला हजर होण्याकामी कार्यमुक्त केल्याचे पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांनी सांगितले.

शासकीय सेवेचा कार्यकाल पूर्ण केल्याने सांगोला पोलीस स्टेशन येथून सहाय्यक पोलीस फौजदार कल्याण ढवणे यांची मंदिर समिती पंढरपुर, पोलीस हेडकॉन्स्टेबल विशाल लेंडवे व पोलीस नाईक तुकाराम व्हरे यांची पंढरपूर शहर पोलिस स्टेशन, पोलीस कॉन्स्टेबल जयंत माळी – अकलूज पोलीस स्टेशन, पोलीस कॉन्स्टेबल पैगंबर मुलाणी अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन, पोलीस कॉन्स्टेबल संतोष चव्हाण पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन, पोलीस कॉन्स्टेबल- सुमित पिसे माळशिरस पोलीस स्टेशन, पोलीस कॉन्स्टेबल राजू माने मंगळवेढा पोलीस स्टेशन, पोलीस कॉन्स्टेबल अनिल दाते वेळापूर पोलीस स्टेशन तसेच विनंतीनुसार पोलीस नाईक राहुल कोरे मोहोळ पोलीस स्टेशन, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सपना गुरव पंढरपुर मंदिर समितीला बदली झाली तर अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यातून सपोनी स्नेहल चव्हाण, पंढरपुर शहर पोलिस स्टेशनचे सहाय्यक फौजदार
कदम, पोलीस हेडकॉन्स्टेबल माने व पोलीस हेडकॉन्स्टेबल ढेरे, करकंब येथून पोलीस नाईक लेंगरे, करमाळा येथून पोलीस नाईक व्यवहारे व पोलीस नाईक गायकवाड,
मंगळवेढा येथून पोलीस कॉन्स्टेबल सावंत व पोलीस कॉन्स्टेबल आवटे, वेळापूर येथून पोलीस कॉन्स्टेबल फुले, मंद्रूप येथून पोलीस कॉन्स्टेबल कांबळे, पंढरपूर ग्रामीण येथून
पोलीस हेड कॉन्स्टेबल घोंगडे तर सोलापूर पोलीस मुख्यालय येथून पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण यांची सांगोला पोलीस स्टेशनला बदली झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button