नाझरे परिसरात तरस प्राणी दिसल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण

नाझरे परिसरात सरगर वाडी, नाझरे, वझरे परिसरात तरस प्राणी दिसल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र घबराट पसरली आहे.

वझरे ता. सांगोला परिसरात तरस प्राणी बुधवार आठ ऑगस्ट रोजी दिसल्याने सर्वत्र भयभीत वातावरण निर्माण झाले आहे. व हा प्राणी शेळ्या, मेंढ्या व नागरिकांना त्रास देतो असे सर्वांना वाटत आहे त्यामुळे दिवसभर वाड्यावर नागरिक घर बंद करून बसत आहेत. तरी वन विभागाने संबंधित प्राण्यास पकडून बंदोबस्त करावा अशी मागणी युवा नेते मल्हारी चव्हाण यांनी केली.

सदरचा प्राणी या अगोदर सरगर वाडी व नाझरे येथे दिसत होता असे नागरिकात बोलले जात आहे परंतु आता वजरे येथे दिसत असल्याने त्याचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button