सांगोला ( उत्तम चौगुले ):-हवालदार महेश अडसूळ यांनी भारतीय सेनेमध्ये 22 वर्षे सेवा देऊन निवृत्त झाल्याबद्दल घेरडी गावचे ग्रामस्थ ,अडसूळ परिवार परिवार आणि सैनिकांच्या कोणत्याही कार्यासाठी नेहमीच अग्रेसर असणारी माजी सैनिक कल्याणकारी संस्था सांगोला यांचे वतीने भव्य मिरवणूक आणि सत्कार समारंभ जंगी स्वागत मातोश्री हॉलमध्ये वासुद रोड येथे करण्यात आले होते.
हवालदार महेश अडसूळ यांनी आपल्या बावीस वर्षाच्या सेवेमध्ये बेगलोर, आदमपूर, डेहराडून, बारामुल्ला, कलकत्ता जलंदर, जम्मू काश्मीर बनवा उत्तराखंड, मिसाइल टेस्टिंग रेंज पोकरण आणि उत्तराखंड हळदवाणी येथे म्हणजे जवळपास संपूर्ण भारत देश भ्रमंती करून आपली देश सेवा संपवून मायदेशी सुखरूप म्हणजे जसे पाठविले गेले तसे परत आले ही फार मोठी सैनिकाच्या परिवारासाठी असणारी गोष्ट कम्प्लीट झाल्यामुळे फॅमिलीच्या आणि ग्रामस्थांच्या वतीने भव्य दिव्य सत्कार समारंभाचे आयोजन केले गेले होते.एका सैनिकाची अशी भव्य दिव्य मिरवणूक सांगोला सेवापूर्ती निमित्त काढली ही आनंदाची आणि देशाचा दृष्टीने फारच महत्वाची गोष्ट आहे.जनतेमध्ये सैनिका विषयी असणारे प्रेम आदर सन्मान यातून दिसत आहे महिला भगिनी ही मोठ्या संख्येने आरती उतारूण स्वागत करण्यासाठी उपस्थित होत्या.
सदर कार्यक्रमांमध्ये माजी सैनिकाचा मानसन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी सर्व नातेमंडळी घेरडी गावचे ग्रामस्थ सांगोला नगरीचे नागरिक, माजी सैनिक, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सदर कार्यक्रमांमध्ये चिरंजीवी परी अडसूळ तिने दिलेले स्वागत पर भाषण आणि आपल्या पप्पा विषयी असणारे आदराचे डान्स गाणे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले सदर कार्यक्रमांमध्ये मनोगत व्यक्त करताना माजी सैनिक संस्थेचे उपाध्यक्ष कॅप्टन दत्ता केदार यांनी महेश अडसूळ यांचे संघटनेमध्ये स्वागत केले आणि आपल्या विचारांमध्ये सैन्याविषयी सैनिकांच्या परिवाराविषयी असणारे आदरणीय विचार व्यक्त केले.एखादा सैनिक घरापासून दूर राहतो देशाची सेवा करतो आणि फॅमिली ची जबाबदारी कशी कसरत चालते याविषयी जनजागृती सैन्याविषयी असणारे मत व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमांमध्ये गोडसे सरांनी आपले मनोगत व्यक्त करताना महेश अडसुळे यांचा लहानपणापासून ते आतापर्यंतचा सर्व इतिहास आपल्या भाषणातून चांगल्या प्रकारे व्यक्त केला तसेच माजी सैनिकाची फॅमिली, भाची साहेबां आणि संघटनेचे सहसचिव उत्तम चौगुले यांनी आपले मनोगत यावेळी मांडले कार्यक्रमाची सांगता स्नेह भोजनाने करण्यात आली