नाझरे ता. सांगोला येथील वकील दत्तात्रय वाघमोडे यांनी सेट परीक्षा अर्थशास्त्र विषयात उत्तीर्ण व निखिल विजयकुमार जावीर यांनी सेट परीक्षा इंग्रजी विषयात उत्तीर्ण झाल्याबद्दल शेतकरी कामगार पक्ष नाझरे, पुरोगामी युवक संघटना व ग्रामपंचायत नजरे यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
सदर प्रसंगी माजी उपसभापती सुनील चौगुले, शिक्षक नेते अशोक पाटील, माजी सरपंच हनुमंत सरगर, शामराव वाघमारे, सोसायटी चेअरमन सुनील बनसोडे, व्हॉइस चेअरमन राजू कोळेकर, युवा नेते बाळासो वाघमारे, नारायण कांबळे, सरपंच संजय सरगर, उपसरपंच सुवर्णा पाटील, माजी उपसरपंच विजय गोडसे, शशिकांत पाटील, विजय सरगर, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी सरगर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.