महूद, ता. ११ : महूद, येथील संजय भोसले हे पस्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक म्हणून नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. सेवानिवृत्ती निमित्ताने त्यांचा नुकताच सपत्नीक सत्कार करण्यात आला.
संजय भोसले यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून महूद,विठ्ठलवाडी,महिम, खवासपूर,सरगरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये सेवा केली. तिसंगी(ता.पंढरपूर) येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक म्हणून ते सेवानिवृत्त झाले आहे.पस्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेमध्ये विविध ठिकाणी उल्लेखनीय काम केले.
सेवानिवृत्ती कार्यक्रमात बोलताना सेवानिवृत्त शिक्षण विस्ताराधिकारी लहू कांबळे यांनी सांगितले की,संजय भोसले हे शिस्तबद्ध,नेमस्त व्यक्तीमत्व आहे.त्यांचा स्वभाव मितभाषी असला तरी ते अत्यंत बुद्धिमान आहेत.त्यांनी आपल्या संपूर्ण सेवेमध्ये अतिशय मनापासून शैक्षणिक काम केले आहे.यावेळी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख श्रीनिवास कुलकर्णी,प्राथमिक शिक्षक जिल्हा पतसंस्थेचे संचालक,मुख्याध्यापक रवींद्र पाटील, दादासाहेब खांडेकर,महादेव कांबळे,निलेश चव्हाण,धनंजय नरळे आदींनी विचार व्यक्त केले.या कार्यक्रमास सेवानिवृत्त केंद्रप्रमुख चंद्रकांत दिवटे,बाबुराव कुलकर्णी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामचंद्र कुंभार,सुरेश लवटे,अनंता जाधव,सुनंदा चव्हाण,मुख्याध्यापक प्रकाश नष्टे, विजय चौगुले, भास्कर महाजन, सुरेश कुंभार, अशोक चव्हाण,बाळासाहेब जाधव, दत्तात्रय लवटे,भीमराव जाधव, राजाभाऊ जाधव यांच्यासह महूद व तिसंगी परिसरातील शिक्षक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.