क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी राजमाता प्रतिष्ठान कार्यालय विशेष सहकार्य करणार : माजी नगरसेवक आनंदाभाऊ माने

सांगोला /प्रतिनिधी: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेतून एकल पालक असणाऱ्या मुलांना आता 2 हजार 250 रुपये मिळणार आहेत. यामध्ये विधवा ,घटस्फोटीत महिला तसेच अनाथ बालकांना ही योजना मिळवण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाकडे अर्ज करणे आवश्यक आहे.
कोरोना नंतर या योजनेच्या लाभार्थ्यामध्ये वाढ झाली असून पूर्वी 1 100 रुपये दिले जायचे. त्यामध्ये वाढ करून आता 2, हजार 250 रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेमध्ये पालकांचे उत्पन्न 2 लाख 50 हजारापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. एकल पालक म्हणजे ज्या मुलांचे आई किंवा वडील वारले आहेत अशा एक पालक असलेल्या मुलांना कॅन्सर किंवा , एच आय व्ही बाधित आजार असलेल्या पालकांच्या मुलांना, तुरुंगात असलेल्या कैद्यांच्या मुलांना या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेचा लाभ फक्त बालकांसाठीच (मुलांसाठी) आहे. या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या व्यक्तींचे फॉर्म संरक्षण अधिकारी कार्यालय ,अभय केंद्र पंचायत समिती सांगोला यांच्याकडे, जमा करून फॉर्म तपासणी करून वरिष्ठ कार्यालयाला पाठवले जातील अशी माहिती अभय केंद्र पंचायत समितीचे सचिन चव्हाण साहेब यांनी दिली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी फॉर्म भरण्यासाठी सांगोल्यातील राजमाता प्रतिष्ठानच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन राजमाता प्रतिष्ठानचे अध्यक्ष, नगरसेवक तथा गटनेते आनंदाभाऊ माने यांनी केले आहे.
या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या पालकांच्या कोणत्याही दोन अपत्यांना वयाची 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रत्येक महिन्याला 2250 रुपये मिळतात. त्यासाठी दोन्ही मुलांचे स्वतंत्र फॉर्म भरणे आवश्यक आहे. घटस्फोटीत, परित्यक्ता महिलांच्या मुलांना लाभ घेता येतो .फक्त घटस्फोटीत महिलांनी घटस्फोट झाल्याचे कागदपत्रासह अर्ज करावा. ज्या महिला पतीपासून विभक्त राहत आहेत त्यांनी तसे पुरावे व सक्षम अधिकाऱ्यांच्या सहीचे पत्र सादर करणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी या महत्वाच्या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे
.यामध्येआवश्यक कागदपत्र 1) योजनेसाठीचा विहित नमुन्यातील अर्ज. 2) पालकांचे व बालकाचे आधार कार्ड झेरॉक्स.3 )मुलांचे शाळेचे बोनाफाईड सटीफिकेट 4 )तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला.5) पालकांचा मृत्यू असल्यास पालकांचा दाखला. 6)पालकांचा रहिवाशी दाखला (ग्रामपंचायत/ नगरपालिका यांचा).7)मुलांचे बँक पासबुक झेरॉक्स व ते नसल्यास पालकांचे बासबुक झेरॉक्स 8) मृत्यूचा अहवाल, (कोविडने जर मृत्यू झाला असेल तर मृत्यूचा अहवाल). 9) रेशनकार्ड झेरॉक्स .10) घरासमोर पालकांसोबत बालकांचा फोटो- 4 बाय 6 पोस्ट कार्ड आकाराचा रंगीन फोटो (दोन मुले असल्यास दोन्ही मुलासोबत पालकांचा स्वतंत्र फोटो). 11) मुलांचे पासपोर्ट आकारातील तीन फोटो.वरिल सर्व कागदपत्रे आवश्यक आहेत.
या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून पात्र ठरत असलेल्या व्यक्तींनी फॉर्म भरण्यासाठी सांगोला येथील राजमाता प्रतिष्ठान च्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन राजमाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व माजी नगरसेवक ,गटनेते आनंदाभाऊ माने यांनी केले आहे.