सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर काॅलेज सांगोला चे माध्यमिक शिक्षक निलकंठ लिंगे यांनी 27 वर्षे प्रदीर्घ सेवेनंतर स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. स्वेच्छानिवृत्ती निमित्त सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला चे संस्था अध्यक्ष डाॅ अनिकेत देशमुख व संस्था सचिव विठ्ठलराव शिंदे यांचे शुभहस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.
निलकंठ लिंगे यांना लहाणपणापासून सामाजिक कार्याची आवड आहे त्यांचे सर्व कुटुंब वारकरी सांप्रदायाचे सेवेकरी आहे त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगोला शहरात झाले सन 1980 ते 1984 जि प प्राथमिक शाळा नं एक सांगोला सन 1984 ते 1992 न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर काॅलेज सांगोला येथे बारावी सन 1992 ते 1995 डाॅ आ गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला येथे बीएस्सी शिक्षण झाले बी एस्सी विद्यापीठ गुणवत्ता यादीत आले महात्मा फुले शिक्षण शास्त्र महाविद्यालय अकलूज येथे बी एड चे शिक्षण झाले बी एड परीक्षेत विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला अकलूज येथे आनंदयात्रा मध्ये तत्कालीन राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांचे हस्ते सत्कार झाला.
27 वर्षे सेवेत गणित विषयाचे अध्यापन करीत असताना असंख्य गुणवंत विद्यार्थी घडविले अनेक विद्यार्थी सध्या डाॅक्टर इंजिनिअर वकील व प्रशासकीय सेवेत आहेत दर रविवारी जादा तास , प्रत्येक प्रकरणावर टेस्ट हे सरांचे वैशिष्ठ होते शाळेत सांस्कृतिक विभाग , पालक शिक्षक संघ , प्रसिध्दी विभाग यामध्ये योगदान होते असंख्य गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली.
सामाजिक कार्यात सर अग्रेसर होते त्यांनी विविध पदाची जबाबदारी घेऊन योगदान दिले जिल्हाध्यक्ष गणित मंडळ , जिल्हाध्यक्ष विज्ञान मंडळ , जिल्हा उपाध्यक्ष माध्यमिक शिक्षक संघ , अध्यक्ष रोटरी क्लब , आजीव सदस्य आपुलकी प्रतिष्ठान , उपाध्यक्ष साने गुरूजी कथामाला , सदस्य वारकरी सांप्रदाय मंडळ या विविध संघटनेत योगदान दिले असून स्वेच्छानिवृत्तीनंतरचे आयुष्यात सामाजिक कार्य करत राहणार असल्याचे निलकंठ लिंगे यांनी सांगितले.