सांगोला महाविद्यालयामध्ये श्री. उमेश शेंबडे याचा सत्कार समारंभ संपन्न

सांगोला / प्रतिनिधी : सांगोला महाविद्यालयाचा माजी विध्यार्थी श्री. उमेश शेंबडे याला नुकतीच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या विद्यापीठाची भौतिकशास्त्र विषयातील पीएच .डी पदवी प्राप्त झाली आहे . त्या निमित्ताने त्याचा सत्कार महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांचे हस्ते करण्यात आला.
आपल्या प्रास्ताविकपर भाषणामध्ये भौतिक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. टी .आर . माने यांनी त्याच्या शिक्षण प्रवासातील अनेक चढ उताराची माहिती सांगितली . घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत प्रतिकुल असतानासुद्धा केवळ जिद्ध ,चिकाटी आणि कठीण परिश्रम या जोरावर त्याने आपले यश संपादन केले आहे.
आपल्या मनोगतामध्ये त्याने आपल्या संशोधनाविषयी महिती संगितली. महाविद्यालयातील अनेक आठवणी सांगितल्या. महाविद्यालयातील अनेक संस्था पदाधीकारी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे मला हे यश संपादन करता आले. पुढे जाऊन याच संशोधन क्षेत्रामध्ये पोस्ट डॉक्टरेट करण्याचा मानस त्याने व्यक्त केला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील डॉ. आर.ए.बुगड, डॉ. सी.एल.जांभळे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या सर्वानी त्याचे अभिनंदन केले व पुढील संशोधनासाठी शुभेच्या दिल्या.