चैतन्य हास्य क्लब तर्फे गणवेश वाटप

सांगोला- शहरातील चैतन्य हास्य क्लब तर्फे सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील गरीब,गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मदत म्हणून गणवेश वाटप करण्याचा प्रस्ताव क्लबचे अध्यक्ष जगताप सर यांनी ठेवला होता.
त्या प्रस्तावास मान देवून क्लब तर्फे सामुदाईक वर्गणीतून रोख रू.दहा हजाराचा धनादेश प्राचार्य अमोल गायकवाड याच्याकडे सूपूर्त करण्यात आला.चैतन्य हास्य क्लब ज्येष्ठ नागरिकाच्या आरोग्या साठी कार्यरत असुन विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवित आहे.
ज्येष्ठ नागरिकाच्या सहली,अंगत- पंगत,आरोग्य तपासणी,आरोग्य विषयी मार्गदर्शन या बरोबर गणवेश वाटप कार्यक्रम घेतल्या बद्दल प्राचार्य गायकवाड यानी आभार मानले.या प्रसंगी संस्था सचिव व हास्य क्लब सद्स्य म.शं.घोंगडे,सुधाकर म्हेत्रे आदि उपस्थित होते.