क्रीडा व युवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत सावे माध्यमिक विद्यालयातील कु. सानिका सचिन लवटे हिने 17 वर्षे वयोगट 61 किलो वजनी गटात फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच सानिका किसन शेळके 14 वर्षे वयोगट 41 किलो वजनी गटात तालुक्यात तृतीय क्रमांक मिळवला आहे.
विद्यालयातील पुनम बाबासो बंडगर, अस्मिता आनंदा शेळके ,नम्रता नागेश माने, सानिका कांबळे ,आकांक्षा देवकते, समृद्धी देवकते व तुषार गडदे यांनीही या कुस्ती स्पर्धेत भाग घेतला होता व त्यामध्ये आपल्या खेळाचे प्राविण्य चांगल्या प्रकारे दाखविले त्याबद्दल वरील सर्व गुणवंत खेळाडूंचा सत्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शेळके सर यांनी गुलाब फूल देऊन अभिनंदन केले व जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या तसेच या खेळाडूंना मार्गदर्शन करणारे विद्यालयातील क्रीडाशिक्षक श्री बर्गे सर यांचाही सत्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. शेळके सर यांच्या हस्ते गुलाब फूल देऊन करण्यात आला.
सदर स्पर्धा बामणी तालुका सांगोला येथील हिंदकेसरी तालीम आखाडा येथे पार पडल्या. . वरील सर्व कुस्तीमध्ये दैदीप्यमान यश मिळवलेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. वसंत शेंडगे सर, सचिव श्री. मुरलीधर इमडे सर, खजिनदार श्री. दिलीप सरगर सर, संचालक श्री. दिलीप शेंडगे सर, श्री. गंगाराम इमडे गुरुजी, श्री. विठ्ठल सरगर सर व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. शेळके सर व क्रीडा शिक्षक श्री. बर्गे सर, विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व सावे ग्रामस्थ यांनी केले व पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.