सांगोला:- आम आदमी पार्टीची विधानसभा निवडणूक नियोजनाबाबतची बैठक जिल्हा अध्यक्ष एम. पाटील यांच्या उपस्थितीत पंढरपूर येथे पार पडली.सदर बैठकीस सांगोला तालुक्यातील आपचे कार्यकर्ते चंद्रकांत खरात,रावसाहेब पवार, साजिद तांबोळी, किसन साळुंखे, तानाजी केदार तसेच मंगळवेढा तालुका अध्यक्ष एकनाथ फाटे उपस्थित होते
सांगोला तालुक्यात राजकीय बदल घडवा या इच्छेपोटी व तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम आदमी पार्टी विधानसभेचा उमेदवार रिंगणात उतरवणार असून तो लवकरच जाहिर केला जाणार आहे.तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी लवकरच जनसंपर्क कार्यालय स्थापन करण्यात येणार आहे
सांगोला तालुक्यामध्ये 5 वर्षात कोणतीही मोठी मैन्युफैक्चर कंपनी आली नाही, नवीन एम आय डी सी झाली नाही तसेच रोजगार निर्मितीसाठी कोणताही प्रयत्न या पाच वर्षात झाला नाही, त्यामुळे सांगोला येथील तरुणांना दुस-या शहराकडे, एम आय डी सी मध्ये रोजगाराला घरदार सोडून जावे लागतं आहे सांगोला तालुक्यामध्ये रोजगार व स्वयंरोजगार निर्मितीसाठी आम्ही अग्रही राहणार असून स्वयंरोजगार हे उद्योजकतेच पहिलं पाऊल आहे.
येत्या 5 वर्षामध्ये 10-20 हजार रोजगार व स्वयंरोजगार निर्मितीसाठी आम्ही कटीबद्ध आहोत त्यादृष्टीने पहिल्या टप्पा पूर्ण केला आहे. अल्पवधीत सांगोला तालुक्याची एक सांस्कृतिक व औद्योगिक तालुका म्हणून ओळख निर्माण होईल असे आम पार्टीचे तालुका अध्यक्ष तानाजी केदार यांनी सांगितले