मौजे शिवणे येथे उच्च माध्यमिक विद्यालय शिवणे यांच्याद्वारे शिवणे गावात एक दिवशीय शिबिरामध्ये गावातील मुख्य चौक व परिसर तसेच स्मशानभूमी,सिद्धनाथ मंदिर,मागासवर्गीय सार्वजनिक समाज मंदिर येथे इयत्ता अकरावी कला व शास्त्र विद्यार्थ्यांनी स्वच्छता केली त्यावेळी या कामानिमित्त ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि रविराज बनसोडे यांनी विद्यार्थ्यांना अल्पोपार दिला
या स्वच्छतेमुळे गावचा परिसर स्वच्छ झाल्याने ग्रामस्थ मध्ये आनंदाचे वातावरण आहे यासाठी प्रकल्प अधिकारी प्राध्यापक -विठ्ठल वलेकर व कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक -हेमंत वाघमोडे तसेच मेटकरी मॅडम,बिचुकले सर, नारनवर सर व बिचुकले सर यांनी सहकार्य केले या स्वच्छतेदरम्याने विद्यालयाचे प्राचार्य विजयकुमार वाघमोडे सर यांनी भेट दिली.