सांगोला (तालुका प्रतिनिधी): अल्पावधीत ग्राहकांच्या विश्वासात पात्र ठरलेल्या माणगंगा परिवार अर्बन को. ऑप क्रेडिट सोसायटी लि.सांगोला या बँकेच्या सांगोला तालुक्यातील वाकी (शिवणे), महूद, कोळा, नाझरे, घेरडी, कडलास, हातीद या गावांमध्ये सात शाखा उघडण्यास परवानगी मिळाली आहे. लवकरच या सात शाखा सुरू करून ग्राहकांना सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती माणगंगा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष नितीन (आबासाहेब) इंगोले यांनी दिली.