शिवसेना विद्यार्थी संघटनेच्या वतीने ३५ हजार वह्यांचे वाटप करण्यात येणार – प्रितेश दिघे 

सांगोला (तालुका प्रतिनिधी): आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना विद्यार्थी संघटनेच्या संकल्पनेतून गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शिवसेना विद्यार्थी संघटनेचे जिल्हाप्रमुख प्रितेश दिघे यांच्या वतीने स्वखर्चातून जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना ३५ हजार वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

       आमदार शहाजीबापू पाटील यांनी ३५ वर्षाच्या राजकीय प्रवासात गोरगरीब, गरजू, कष्टकरी, कामगार, मजुर, दीनदलित, उपेक्षित, वंचित घटकांसह शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य दिले. आक्रमक भाषाशैली, शासनाच्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, समाजाविषयी तळमळीने काम करण्याची इच्छा तसेच राजकारणाची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसलेला नेता म्हणून आमदार शहाजीबापूंची ओळख आहे

.

आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्याचा वारसा जोपासण्यासाठी तसेच शिवसेना विद्यार्थी संघटनेच्या संकल्पनेतून शिवसेना विद्यार्थी संघटनेचे जिल्हाप्रमुख प्रितेश दिघे यांच्या वतीने स्वखर्चातून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना ३५ हजार वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे. या वह्या वाटपाचा शुभारंभ नवी मुंबईचे जिल्हाप्रमुख तथा सांगोला विधानसभा निवडणूक प्रभारी विजय चौगुले व आमदार शहाजीबापू पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button