सांगोला (प्रतिनिधी): भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्त दि. ०९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२४ या दरम्यान ‘हर घर तिरंगा अभियान’ देशभर राबविण्यात येत आहे. महाविद्यालयीन विदयार्थ्यामध्ये देश सेवेची व देश भक्तीची भावना वृद्धींगत व्हावी या उद्देशान हे अभियान देशभर राबविण्यात येत आहे. या निमित्ताने सांगोला महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजना विभागाने मंगळवार दिनांक १३ ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा रॅलीचे आयोजन केले.
या रॅलीचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. बाबूरावजी गायकवाड याचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, युवकांनी देशसेवेसाठी सैदव तत्पर असले पाहिजे. देशाला मिळालेले स्वातंत्र्य अबाधीत ठेवण्यासाठी विद्यार्थी व सर्व नागरीकांनी पुढे आले पाहिजे. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी रॅलीस शुभेच्छा दिल्या.
या रॅली मध्ये राष्ट्रीय छात्र सेना कंपनी कमांडर कॅप्टन संतोष कांबळे तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.नवनाथ शिंदे व डॉ. सदाशिव देवकर त्याचबरोबर डॉ. राम पवार, प्रा. वासुदेव वलेकर, डॉ. भारत पवार, डॉ. अमोल पवार, डॉ. विद्या जाधव, प्रा. जगदीश चेडे यांनी रॅलीत सहभाग घेतला. ही रॅली यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सेवेकांचे मोलाचे सहकार्य लाभले. राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र व राष्ट्रीय सेवा योजनाचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले. ही रॅली सांगोला शहर परीसरात संपन्न झाली.