राजुरी येथील शेकापसह शहाजीबापू गटाच्या कार्यकर्त्यांचा दिपकआबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

सांगोला तालुक्यातील शहाजीबापू गटासह शेतकरी कामगार पक्षातील मनमानी कारभाराला कंटाळून सांगोला तालुक्यातील राजुरी गावातील असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षाला अखेरचा रामराम करीत दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. सांगोला तालुक्यातील राजुरी गावात शेकापसह शहाजीबापू गटाला धक्का बसला असून असंख्य कार्यकर्त्यांनी दिपकआबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करीत मशाल हाती घेतली आहे.
शहाजीबापू गटासह शेतकरी कामगार पक्षाचे सध्याचे नेतृत्व विश्वासात घेत नसल्याने तसेच अंतर्गत गटबाजीला कंटाळून कार्यकर्ते पक्षाला सोडचिठ्ठी देऊन दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. सांगोला तालुक्यातील राजुरी गावात शेकापसह शहाजीबापू गटाला धक्का बसला असून असंख्य कार्यकर्त्यांनी दिपकआबांच्या उपस्थितीत शिवाजीराव जावीर व नितीनभाऊ रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश करीत मशाल हाती घेतली आहे.
राजुरी येथील अमित बिचुकले, यश साळुंखे, अक्षय बाबर, प्रणव मोरे, महेश धोत्रे, साजन जावीर, संदीप मंडले, दत्ता खुळे, दर्लिंग दबडे, सोहेल पटेल, प्रशांत बंडगर, स्वप्नील चव्हाण, दत्ता वाघमारे, विशाल काटे, अक्षय धाजुरे, दिनेश चंदनशिवे, दीपक चंदनशिवे, अरबाज तांबोळी, गौतम चव्हाण, तोहिद पटेल, राहुल बंडगर, संदीप मंडले, मोहन पवार, तुषार बनसोडे, सिद्धांत काटे, सोमनाथ कांबळे, साहील पटेल, सचिन व्हरगर, असिफ पटेल, सादिक पटेल, आशिष काटे, सुरज काटे, तानाजी येजगर, शंकर येजगर, समाधान व्हरगर, समाधान कांबळे, विजय वाघमारे, महेश वाघमारे, नितीन दोडके, शहाजी काटे या कार्यकर्त्यांनी शेकापसह शहाजीबापू गटाला रामराम करीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांना राजुरी गावातून विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.