श्री.महेश बनकर यांच्या कडून जि. प. प्रा. शा. बनकरवाडी विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस चे वाटप
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनकर वाडी येथे स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिन असल्याने सर्व विद्यार्थ्यांजवळ एक सारखा गणवेश नव्हता. त्याचबरोबर शाळेला विद्यार्थ्यांसाठी स्पोर्ट ड्रेसचेही आवश्यकता होती. म्हणून सर्व विद्यार्थ्यांसाठी स्पोर्ट ड्रेस श्री महेश सिद्धेश्वर बनकर (शिवतेज उद्योगसमूह) यांच्या सौजन्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनकरवाडी येथील शंभर विद्यार्थ्यांसाठी स्पोर्ट ड्रेसचे वाटप करण्यात आले.
सदर स्पोर्ट ड्रेस ची किंमत सर्व विद्यार्थ्यांची मिळून चाळीस हजार रुपये श्री महेश बनकर शिवतेज उद्योगसमूह ग्रुप यांचे तर्फे मिळाले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनकर वाडी येथे नेहमीच पालकांचे सहकार्य उत्कृष्ट असते. त्याचेच आजचेही स्पोर्ट ड्रेस वाटप उत्कृष्ट उदाहरण होय.
स्पोर्ट ड्रेस मिळाल्याने सर्व विद्यार्थी व पालक ,शिक्षक यांना खूप खूप आनंद झाला. सर्व विद्यार्थी स्पोर्ट ड्रेसच्या गणवेशामध्ये अतिशय सुंदर दिसत होती .शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती डॉ. राजेश्वरी कोरे मॅडम यांनी शिवतेज उद्योगसमूह यांचे आभार मानले.
गटशिक्षणाधिकारी श्री.सुयोग नवले साहेब ,विस्तार अधिकारी श्री.लक्ष्मीकांत कुमठेकरआणि केंद्रप्रमुख श्री.अस्लम इनामदार यांनी पालकांचे अभिनंदन करून त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.