सांगोला(प्रतिनिधी):-रोटरी क्लब सांगोला व इनरव्हील क्लब सांगोला यांचे संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे गुरुवार दि.15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीपर गीतावर आधारित शालेय समूह नृत्य स्पर्धा मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये 21 स्पर्धेत शाळांनी सहभाग नोंदविला.सांगोला क्लबचा दरवर्षीचा हा एक मोठा कार्यक्रम असतो.परीक्षक म्हणून श्री.प्रताप थोरात, श्री.संजय पवार,कु.पूजा क्षीरसागर यांनी काम पाहिले.
आठवी ते दहावी. गटामध्ये प्रथम क्रमांक. सिंहगड पब्लिक स्कूल कमलापुर यांना रुपये 5000 व ट्रॉफी असे पारितोषिक कार्यक्रमाचे बक्षीसदाते रो. रमेश अण्णा देशपांडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.द्वितीय क्रमांक. फॅबटेक पब्लिक स्कूल सांगोला यांना रुपये 4000 व ट्रॉफी असे पारितोषिक कार्यक्रमाचे बक्षीसदाते रो. बालाजी ट्रेडर्स श्री बिरबल चौधरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.तृतीय क्रमांक न्यू इंग्लिश स्कूल सांगोला यांना रुपये 3000 व ट्रॉफी असे पारितोषिक कार्यक्रमाचे बक्षीसदाते रो. इंजि.संतोष गुळमिरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
पाचवी ते सातवी गटात प्रथम क्रमांक सिंहगड पब्लिक स्कूल कमलापूर..यांना रुपये 4000 व ट्रॉफी असे पारितोषिक कार्यक्रमाचे बक्षीसदाते सानिका मोबाईल अॅक्सेसरीज रो. धनाजी शिर्के यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.द्वितीय क्रमांक.. सांगोला विद्यामंदिर प्रशाला सांगोला यांना रुपये 3000 व ट्रॉफी असे पारितोषिक कार्यक्रमाचे बक्षीसदाते माणगंगा परिवार समूह रो.नितीन इंगोले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.तृतीय क्रमांक उत्कर्ष प्राथमिक विद्यालय सांगोला यांना रुपये 2000 व ट्रॉफी असे पारितोषिक कार्यक्रमाचे बक्षीसदाते श्री ट्रेडर्स अँड कंपनी श्री विकास पांढरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
शालेय गट पहिली ते चौथी गटात प्रथम क्रमांक सिंहगड पब्लिक स्कूल कमलापुर यांना रुपये 3000 व ट्रॉफी असे पारितोषिक कार्यक्रमाचे बक्षीसदाते डॉ.सौ.नेहा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.द्वितीय क्रमांक फॅबटेक पब्लिक स्कूल सांगोला सांगोला यांना रुपये 2000 व ट्रॉफी असे पारितोषिक कार्यक्रमाचे बक्षीसदाते सौ.अश्विनी कांबळे व सौ.पल्लवी थोरात यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तृतीय क्रमांक सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालय सांगोला यांना रुपये 1000 व ट्रॉफी असे पारितोषिक कार्यक्रमाचे बक्षीसदाते सौ. दिपाली कोळसे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
प्रास्ताविक रोटरी क्लबचे अध्यक्ष इंजि.विकास देशपांडे यांनी, सूत्रसंचालन निसार इनामदार सर व प्रशांत इंगोले यांनी, बक्षीसांचे संकलन व वाचन इंजी हमीद शेख, इंजि.संतोष भोसले, डॉ.प्रभाकर माळी, डॉ.मच्छिंद्र सोनलकर इंजि.मधुकर कांबळे व सौ.स्वाती अंकलगी यांनी तर आभार अशोक गोडसे यांनी मानले.स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी रोटरी क्लब व इनरव्हील क्लबच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी हजेरी लावली होती.