सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज १९ वर्षे वयोगट मुलींच्या संघाने तालुका क्रीडा संकुल, सांगोला येथे १२ ऑगस्ट २०२४ संपन्न झालेल्या तालुकास्तरीय हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत अंतिम सामन्यात सिंहगड पब्लिक स्कूल कमलापूर या संघास पराभूत करून प्रथम क्रमांक मिळविला.
वरील सर्व यशस्वी खेळाडू विद्यार्थ्यांचा संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य अमोल गायकवाड, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे,पर्यवेक्षक सुरेश मस्तुद, प्रदीप धुकटे,मच्छिंद्र इंगोले व क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख प्रशाला सुनील भोरे,क्रीडा विभाग प्रमुख ज्युनिअर कॉलेज प्रा.डी.के पाटील, प्रा.संतोष लवटे.नरेंद्र होनराव, सुभाष निंबाळकर, स्नेहल देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत,सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके,संस्था सदस्य विश्वेश झपके, उपमुख्याध्यापिका शहिदा सय्यद, सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.