सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये रंगला नवागतांचा स्वागत सोहळा

सोमवार दि. 3/6/2024 पासून सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलच्या 2024-25 या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळेचे आवार गजबजले. शाळेत पहिले पाऊल ठेवलेल्या चिमुकल्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी यासाठी खाऊ वाटप करण्यात आले.
शाळेच्या आवारात काढलेल्या रांगोळ्या,तोरण,फुलांनी सजवलेले वर्ग आणि संगीताच्या सुरावटीने मुलांचे स्वागत करण्यात आले.गुलाबपुष्पांने मुलांचे चेहरे खुलले होते त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यही देण्यात आले. पहिला दिवस असल्याने नवे वर्ग,नवे वर्गशिक्षक जाणून घेण्यासाठी विद्यार्थी उत्सुक होते. टॉम आणि जेरी यांच्या प्रतिकात्मक वेशभूषांनी सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले व यांच्या सोबत विद्यार्थ्यांनी धमाल केली .नवागतांचा हा स्वागत सोहळा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्राथमिक विद्यालयाचे प्र. मुख्याध्यापक श्री.उदय बोत्रे यांच्या हस्ते कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका कु. रोहिणी महारनवर, कु. सुकेशनी नागटिळक, विद्यार्थी,पालक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. लता देवळे यांनी केले.
सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलचा गुणवत्तेचा आलेख हा उत्तरोत्तर वाढत असून याही वर्षी इ.10वीचा निकाल शंभर टक्के लागला असून यामध्ये विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले तसेच विविध बाह्य स्पर्धा परीक्षेतही दरवर्षी विद्यालयाचे विद्यार्थी चमकतात त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी नवनवीन उपक्रम राबवले जातात. नर्सरी ते इ.10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू असून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश लवकरात लवकर घ्यावा असे आवाहन विद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. प्रवेशासाठी संपर्क-7776966200/9730813322