महाराष्ट्रराजकीयसांगोला तालुका

पाठपुराव्याला यश, दादर-पंढरपूर रेल्वे सांगोलामार्गे साताऱ्यापर्यंत धावणार ; भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांची माहिती

पाठपुराव्याला यश, दादर-पंढरपूर रेल्वे सांगोलामार्गे साताऱ्यापर्यंत धावणार

भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांची माहिती

सांगोला (तालुका प्रतिनिधी): विठ्ठल भक्तांसाठी मध्य रेल्वेकडून दादर-पंढरपूर गाडीचा व्हाया सांगोला, मिरजमार्गे साताऱ्यापर्यंत विस्तार करण्यात आला आहे. १५ मार्च पासून ही गाडी धावणार असल्याने वारकऱ्यांना पंढरपूरला जाण्यासाठी नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. या विस्तारामुळे कर्नाटकातून येणाऱ्या प्रवाशांनाही याचा फायदा होणार आहे. सांगोला, मंगळवेढा, जत, आटपाडी तालुक्यातील प्रवाशांना पुणे, मुंबईला जाण्यासाठी सोईचे होणार आहे. विशेषत: आषाढी व कार्तिकी एकादशीवेळी विठ्ठल- रुख्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला येणाऱ्या वारकरी भाविक भक्तांना या रेल्वेतून प्रवास करता येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.

पंढरपूरला श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांची तसेच मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दादर पंढरपूर रेल्वेचा विस्तार साताऱ्यापर्यंत करावा अशी मागणी रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव, खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडे करीत सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून मध्य रेल्वेकडून दादर-पंढरपूर गाडीचा व्हाया सांगोला, मिरज मार्गे सातारापर्यंत विस्तार करण्यात आला आहे. या गाडीमुळे सांगोला, मंगळवेढा, जत, आटपाडी तालुक्यातील प्रवाशांना पुणे, मुंबईला जाण्यासाठी सोईचे होणार आहे.
सध्या दादर-पंढरपूर एक्सप्रेस रेल्वे दर रविवार, सोमवार व शुक्रवारी धावते आणि दादर ते पंढरपूर दरम्यान नऊ रेल्वे स्थानकांवर थांबते. नवीन अधिसूचनेनुसार दादर-पंढरपूर एक्सप्रेस गाडीस सातारा, कोरेगाव, मसूर, कऱ्हाड, ताकारी, किर्लोस्करवाडी, भिलवडी, सांगली, मिरज, कवठेमहांकाळ, ढालगाव, जत रोड, म्हसोबा डोंगरगाव, सांगोला, पंढरपूर, कुर्डुवाडी, केम, जेऊर, भिगवण, दौंड, केडगाव, उरुळी, पुणे, चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, ठाणे आणि दादर असे थांबे राहणार आहेत.

 

ही गाडी सातारा येथून आठवड्यातून तीन दिवस म्हणजे सोमवार, मंगळवार आणि शनिवारी दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी सुटणार असून सांगोला येथे रात्री ८ वाजून १३ मिनिटांनी, पंढरपूर येथे रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी पोहोचेल.

 

मुंबई येथील दादर येथे सकाळी ६ वाजून ३५ मिनिटांनी पोहोचेल. ही गाडी दादरहून आठवड्यातून रविवार, सोमवार आणि शुक्रवारी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी सुटणार असून पंढरपूर येथे सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी, सांगोला येथे ८ वाजून ४० मिनिटांनी पोहोचेल. तर सातारा येथे दुपारी २ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल. दादर- पंढरपूर एक्स्प्रेसचा मिरज मार्गे साताऱ्यापर्यंत विस्तार करण्यात आल्यानं सातारा आणि सांगलीतील वारकऱ्यांना पंढरपूरला जाण्यासाठी नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. या विस्तारामुळे कर्नाटकातून येणाऱ्या प्रवाशांनाही याचा फायदा होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!