श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर धायटी प्रशालेमध्ये 78वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर धायटी प्रशालेमध्ये 78 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ धायटी या संस्थेचे विश्वस्त सेवानिवृत्त आय.एफ.एस अधिकारी श्री.माणिक भोसले होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीराम क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ धायटी या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर शिवराज भोसले होते.ध्वजारोहण करण्यासाठी इयत्ता दहावीच्या वर्गातील विद्यार्थिनींनी मार्चिंग करून प्रमुख पाहुण्यांना ध्वजारोहण करण्याची अनुमती दिली.
सदर मार्चिंगची तयारी प्रशालेतील क्रीडा शिक्षक श्री.रामभाऊ वाघमोडे सर यांनी केली होती.डॉक्टर श्री.शिवराज भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.विजयकुमार जगताप, माजी मुख्याध्यापक श्री.मनोहर इंगवले, पालक , नागरीक ,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर प्रशालेतील सहशिक्षक श्री.बी.डी. भोसले सर यांनी राष्ट्रगीत,ध्वजगीत व राज्यगीत गायन केले. तदनंतर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते व मनोगत व्यक्त केली. तसेच डॉ.शिवराज यांचा वाढदिवसानिमित्त प्रशालेकडून मानाचा फेटा,शाल, पुष्पगुच्छ देऊन मुख्याध्यापक विजयकुमार जगताप यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
तसेच सांगोला येथील शिवशाहीर कुमारी माया भोसले यांनीही देशभक्तीपर गीत सादर केले. प्रशालेतील विविध विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पातळीवर मिळवलेल्या यशाबद्दल मान्यवराकडून त्यांना विविध बक्षिसे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्याच बरोबर इयत्ता दहावी मार्च 2024 बोर्ड परीक्षेत प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पालकांनी दिलेल्या अमर बक्षीस योजनेतील विविध बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
सदर कार्यक्रमास संस्थेचे सचिव श्री संजय रामदास भोसले सर, माजी विस्तार अधिकारी श्री.नामदेव भोसले साहेब,धायटी गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद अण्णा जगदाळे ,नूतन सरपंच रवींद्र मेटकरी ,गणेश कदम ,शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री.लक्ष्मण भोसले ,श्री.नानासाहेब झेंडे ,श्री. लक्ष्मण भोसले (बाबा), श्री. बापूसो जगदाळे, श्री.आबासो जगदाळे ,श्री.जालिंदर फाटे ,श्री.बनसोडे, श्री.राजू कदम, श्री.बंडू शिनगारे, श्री.राजेंद्र जगदाळे ,श्री.नंदकुमार भोसले ,श्री.शिवाजी भोसले तसेच धायटी गावातील पालक ,ग्रामस्थ, नागरीक, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशभक्तीपर गीते व मनोगत व्यक्त करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास स्वर्गीय रामदास सदाशिव भोसले गुरुजी यांचे स्मरणार्थ अध्यक्ष श्री. शिवराज भोसले यांचे कडून 101 रुपये, तसेच प्रशाले कडून 200 पेजेस एक वही व श्री.गणेश कदम यांचे कडून पेन व पेन्सिल अशी बक्षिसे देण्यात आली. तसेच याच कार्यक्रमात एमपीएससी परीक्षेमधून नूतन पीएसआय म्हणून निवड झालेले धायटी गावचे सुपुत्र श्री.चिराग गायकवाड यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
सर्व विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आला. डाॅ.शिवराज भोसले यांनी वाढदिवसानिमित्त प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना जिलेबी खाऊ म्हणून दिली.अनेक पालकांनीही विद्यार्थ्यांना खाऊ साठी बिस्कीट पुडे, चॉकलेट पुडे दिले. उपस्थित सर्वांचे आभार प्रशालेतील सहशिक्षक श्री.केशव मोरे सर यांनी मानले. खाऊ वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



