शिवणे माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालयात महावाचन उपक्रम व राखी बनविणे कार्यशाळा संपन्न

शिवणे वार्ताहर-महाराष्ट्र शासन आणि शिक्षण विभाग यांचे तर्फे महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या शाळा आणि कॉलेजमधील मुलांच्यात वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी महावाचन हा उपक्रम आणि अभ्यासाचा ताण कमी होण्यासाठी आनंददायी शनिवार हे उपक्रम सध्या राबविले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून विद्यालय व ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य विजयकुमार वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाचा प्रांगणात महावाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यालयातील सर्व मुलांना ” महावाचन”या अक्षराच्या आकारात बसवून ग्रंथालयातील पुस्तके वाचन करण्यास दिली.सुमारे दीड तास दिलेल्या पुस्तकांचे वाचन मुलांनी आणि सर्व शिक्षकांनी केले.
अनेक विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया पण लिहून दिल्या .
त्यानंतर महिला शिक्षिका प्रा.शोभनतारा मेटकरी,सविता येडगे आणि पल्लवी सातपुते यांनी राखी तयार करण्याची कार्यशाळा घेतली.यामध्ये सर्वांनी राखी साठी लागणारे साहित्य आणले होते.अतिशय सुंदर राख्या तयार करण्यात आल्या त्याच राख्या विद्यालयातील सामूहिक राक्षबांधनात बांधल्या जाणार आहेत असे त्यांनी सांगितले.
वरील दोन्ही उपक्रमासाठी ग्रंथालय विभाग आणि स्टाफ चे सहकार्य लाभले.