राज्यस्तरीय श्रमिक मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते विश्वविक्रम वीर स्वर्गीय मा. आमदार डॉ. गणपतरावजी देशमुख साहेब यांच्या 98 व्या जयंती निमित्त सांगोला येथे ‘ राज्यस्तरीय श्रमिक मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या मॅरेथॉन स्पर्धेचे सलग 19 व वर्ष असून 13 ऑगस्ट 2025 रोजी पुरुष खुला गट यांच्या करता 7 किलो मीटर “राज्यस्तरीय श्रमिक मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले असून स्पर्धा सकाळी 6:30 वाजता सुरू होईल.
प्रथम क्रमांक 7000 रू. द्वितीय क्रमांक 5000 रू. तृतीय क्रमांक 4000 रू. चौथा क्रमांक 3000 रू. पाचवा क्रमांक 2000 रू.साहवा क्रमांका साठी 1000 रू. व सर्व विजेत्यांना ट्रॉफी असे स्वरूप आसून खेळाडूंनी स्वतःच्या जबाबदारी वरती स्पर्धे मध्ये धावायचे आहे.
सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे. डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला व न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज सांगोला यांच्या संयुक्त विद्यमानाने या ‘राज्यस्तरीय श्रमिक मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन दर वर्षी केले जाते.
तरी महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आव्हान संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिकेत भैया देशमुख संस्थेचे सचिव श्री विठ्ठलराव शिंदे सर,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिकंदर मुलांनी सर प्राचार्य केशव माने सर यांनी केलेले असून या स्पर्धा उत्कृष्ट रित्या पार पाडण्यात आली महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विजय पवार प्रा.डॉ. जगन्नाथ ठोंबरे प्रा. हिम्मत साळुंखे प्रा. डॉ. ज्योतिबा हूरदुखे प्रा.कामाजी नायकुडी प्रा.अरुण बेहेरे व क्रीडा शिक्षक सचिन हजारे त्यांचे इतर सहकारी परिश्रम घेत आहेत.



