सांगोला विद्यामंदिर पूर्व प्राथमिक विद्यालयातील शिशुरंजन, छोटा शिशु व मोठा शिशु या वर्गाची स्वयंभू श्री सावळेश्वर महादेव मंदिर सावे येथे मोठ्या उत्साहात क्षेत्रभेट संपन्न झाली.
या क्षेत्रभेट अंतर्गत महादेव मंदिराची माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रोहिणी महारनवर मॅडम यांनी दिली. या क्षेत्रभेटीला विद्यार्थ्यांनी गाणी गोष्टी सादर केल्या. सदरच्या ठिकाणाचा मनसोक्त विविध खेळांचा आनंद घेतला. तसेच स्वयंभू सावळेश्वर महादेव मंदिरामध्ये छोट्या बाल चिमुकल्यांनी मनसोक्त जेवणाचा आस्वाद घेतला. सावे येथील ग्रामस्थांनी बाल चिमूकल्यांना खाऊ दिला.
तसेच सांगोला विद्यामंदिर या संस्थेचे खूप कौतुक केले.या ठिकाणाच्या क्षेत्रभेटीसाठी विद्यालयातील शिक्षिका यांनी विद्यार्थ्यांना शाळा अंतर्गत असलेल्या विविध उपक्रमांचे महत्त्व सांगितले. या क्षेत्रभेटीत प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु.शुभांगी पवार व पूर्व प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रोहिणी महारनवर मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
सदर क्षेत्र भेट पार पाडण्यासाठी विद्यालयातील सहशिक्षिका अरुणा बिराजदार यांनी विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.