महाराष्ट्र
फॅबटेक पब्लिक स्कूल मध्ये ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल मध्ये मेरी ख्रिसमस सण उत्साहात साजरा झाला. प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा होतो. ख्रिस्त जयंती प्रेम, उमेद, आशा यांचा उत्सव असतो.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे , डॉ. सुरज रुपनर सौ.सुरेखा रुपनर व सौ.सारिका रुपनर, स्कूलचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील, सुपरवायझर सौ. वनिता बाबर हे लाभले. प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांनी स्वागत केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कु. आचल येड्रावकर व श्रेया जगताप यांनी नाताळ सणाबद्दल माहिती विद्यार्थ्यांना सांगितली ,यानंतर संगीतशिक्षक डॉ. अमोल रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी एक सुंदर समूहगीत सादर केले.
पूर्व प्राथमिक विभागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य सादर केले. तसेच सांताक्लॉजच्या वेशभूषा सादर करत रॅम्प वॉक केला. यानंतर प्रमुख पाहुणे व चिमुकले सांताक्लॉज यांच्यासोबत ख्रिसमस केक कापला. कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे ,स्कूलचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता पाचवीतील विद्यार्थी दक्ष कोळेकर, वेदांत कळमनकर, शाश्वत अवताडे, पार्थ चोरमुले, आधिराज शिंदे यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.