महूद खून प्रकरणातील पीडित कुटुंबियांच्या मदतीला धावून आले दिपकआबा

कार्यतपस्वी स्व. आम.काकासाहेब साळुंखे पाटील व स्व ह.भ.प शारदादेवी साळुंखे पाटील यांचा समाजकारणाचा वारसा लाभलेले मा.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील हे नेहमीच समाजातील सर्व घटकांच्या सुखदुःखात नेहमीच सहभागी असतात उभ्या आयुष्यात आबांनी जात, धर्म,पक्ष,पार्टी न पाहता गोरगरीब गरजू लोकांच्या मदतीला धावून जाणारे एकमेव नेते म्हणून आबांची ख्याती सर्वश्रुत आहे त्याचाच एक उदाहरण म्हणजे महूद बु येथे ११ जुलै रोजी मातंग समाजातील युवक सुनील कांबळे यांची समाज मंदिरासमोर निर्घृण हत्या केली होती.
घटनेचे पडसाद राज्यभर मोर्चे आंदोलनाच्या माध्यमातून उमटले होते. घटनेची तात्काळ दाखल घेऊन दिपक आबांनी कांबळे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. परंतु कुटुंबाची अत्यंत गरीब परिस्थिती उघड्यावर पडलेला संसार व दोन लहान मुले पाहून दिपक आबांनी कांबळे कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचे जाहीर केले. प्रशासनाकडून पीडित कुटुंबीयांना न्याय मिळेलच मात्र पीडित कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत महूद गावभेट दौरा करीत असताना दिपक आबांनी आवर्जून मयत सुनील कांबळे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली व कुटुंबाच्या पाठीशी कायम राहणार असल्याचा शब्द दिला.
त्यांच्या शब्द पूर्ती मुळे कांबळे कुटुंब तसेच समस्त मातंग समाज बांधवानी दिपक आबांच्या संवेदनशील कृती बद्दल आभार मानले. दिपक आबांनी दाखवलेली माणुसकी व संवेदनशीलता मातंग समाज विसणार नाही असे मत विनोद रणदिवे यांनी मांडले.
—————
दिपकआबा यांनी स्व.सुनील कांबळे यांच्या कुटुंबियांना दिलेली मदत ही दिपकआबा यांच्यातील प्रेमळ व संवेदनशील माणूस दर्शवणारी कृती आहे. दिपकआबांनी दिलेलं योगदान व मदत तालुक्यातील मातंग समाज कधीच विसणार नाही.
ॲड.अभिषेक कांबळे