महाराष्ट्र

मॉल मधून अज्ञात चोरट्यानी पळविला 1 लाख 60 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल

सांगोला (प्रतिनिधी):-  मॉल मधून अज्ञात चोरट्यानी 1 लाख 60 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पळविला असून काजू, बदाम , तूप , तेल ,साबण ,साखर व इतर किराणा साहित्यासह रोख रक्कम चोरून नेली असल्याची घटना 19 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास सांगोला तालुक्यातील महुद बु.  येथे घडली आहे. याप्रकरणी दिनांक 22 जुलै रोजी किरण गांधी रा. महुद बु. ता. सांगोला यांनी सांगोला पोलीसात अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली आहे.

याबाबत सांगोला पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांचा महूद येथे मॉल असून दिनांक 19 जुलै 2025 रोजी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास नेहमी प्रमाणे मॉल बंद केला होता. दुसर्‍या दिवशी दिनांक 20 जुलै 2025 रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मॉल उघडले असता, मॉलमधील सुमारे 1 लाख रुपये काजू, बदाम गावरान तुप बॉटल, बजाज तेल बाटली, कोल्ड्रीक्स बाँटल, फुटाणे, बिस्कीट बॉक्स, फेसवॉस बॉटल, चहा पावडर, आटा बॅग, संतुर साबण, कोलगेट पेस्ट,जेमीनी तेलाचे डब्बे, साखर पिशवी तसेच सुमारे 20 हजार रुपये किंमतीचे इलेक्ट्रीकल ड्राव्हर, सीसीटीव्ही फुटेजचा डिव्हीआर बॉक्ससह 40 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 1 लाख 60 हजार रुपये किंमतींची मुद्देमाल अज्ञात चोरट्यानी चोरून नेला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास पोहेकॉ झोळ हे करीत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button