श्री गुरु लीलामृत या ग्रंथाची नाझरे येथे समाप्ती
नाझरे प्रतिनिधी
पृथ्वीतलावर मानवामधील न्याय, नीती, अहिंसा, धर्म, मानवता याचा ऱ्हास होऊ लागला व जीवन प्रवाहात अधर्म, अन्याय वाढू लागला असता भगवंताला जगाच्या उद्धारासाठी संत सज्जनाचे रक्षणासाठी, दृष्टांचे निर्धारण करण्यासाठी अवतार घ्यावा लागतो व यासाठी परब्रम्ह परमात्म्याने श्री दत्त अवतार घेतला. व दत्त संप्रदायाची स्थापना करून श्री दत्तात्रेय, श्रीपाद वल्लभ, श्री नरसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ असे अवतार घेतले, व भक्तीचा मार्ग दाखविला व या उदात्त विचाराने श्री गुरु लीलामृत हा ग्रंथ स्वामी समर्थ लिहिला गेला आहे.
सदर ग्रंथाची हनुमान मंदिर नाझरे ता. सांगोला येथे समाप्ती झाली व नवीन भक्ती विजय शेगावकर महाराज हा ग्रंथ वाचनास सुरुवात झाली.
या ग्रंथाची पूजा भारत शेळके व उषा शेळके यांच्या शुभहस्ते करण्यात आली. ग्रंथाचे भावार्थ दत्तात्रय स्वामी यांनी तर वाचन प्रकाश पाटील, डॉक्टर सोनवणे, सुनील पोरे, प्रफुल्लता देशपांडे, विनोद देशपांडे यांनी केले. पुरोहित म्हणून बाळासो स्वामी यांनी काम पाहिले. यावेळी तम्मा पाटील, लक्ष्मण काका पाटील, महादेव पाटील, अण्णाप्पा चौगुले, सुनील पोरे, अरविंद शेटे, बलभीम सोनार, अशोक बुवा पाटील, मुकुंद पाटील, जयपाल गुरु व, सोमनाथ स्वामी, महेश देशपांडे, सारंग देशपांडे, रामचंद्र जांभळे, शामराव गोडसे, महिला, भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.