वाटंबरेचे सुरेश पवार ईनस्पायर अवॉर्ड ने सन्मानीत.

नाशिक येथे दि.२७ सप्टेंबर रोजी वाटंबरे येथील यशराज गांडूळ खत प्रकल्पाचे युवा उद्योजक सुरेश पवार यांना ईनस्पायर अवॉर्ड ने सन्मानीत करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक चे कुलगुरू प्रा. संजीव सोनवने व अभिनेत्री स्मिता प्रभू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रिझर्व बँक ऑफ इंडियाचे मुख्य लेखापाल सिए चतुर्वेदी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रमुख संशोधक डॉ .तुळशीदास बास्टेवाड, ऍग्रोकेअर ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन भूषण निकम, आबा अहिरे, आयोजक रोहिणी पाटील ,प्रकाश सांगळे उपस्थित होते.
सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथे सुरेश पवार यांनी गांडूळ खताचे सुरू केलेले अतिशय उच्च प्रतीचे गांडूळ खत आणि वर्मी वॉश शेतकऱ्यांना उपलब्ध करून त्यांनी अल्पावधीतच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. यशराज गांडूळ खतास अनेक प्रगतशील शेतकऱ्यांनी पहिली पसंती दिली आहे. पाच बेड पासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज शंभर बेड च्या पुढे गेला आहे. उत्तम दर्जाच्या गांडूळ खतासाठी व वर्मी वाश साठी त्यांनी महाराष्ट्रा बरोबर इतर राज्यात ओळख निर्माण केली आहे. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हा पुरस्कार स्वीकारतेवेळी त्यांच्यासोबत सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनाजी पवार, संतोष पाटील, शरद पवार व विकास मोहिते उपस्थित होते.