सांगोला विद्यामंदिरमध्ये नवागतांचे उत्साहात स्वागत.

सांगोला (प्रतिनिधी) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्यू .कॉलेज सांगोला येथे शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ मध्ये १६ जून २०२५ रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी इयत्ता ५ वी मध्ये नव्याने प्रवेशित झालेले विद्यार्थ्यांचा व ६ वी ते ९ वी व १२ वी मधील विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापिका शहिदा सय्यद,उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक प्रदीप धुकटे यांचे हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्येची देवता सरस्वती प्रतिमेचे पूजन व संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य चं.वि. तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास नव्याने प्रवेशित झालेले विद्यार्थी व पालकांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला.
यावेळी शाळेच्या पहिल्या दिवशी सांगोला विद्यामंदिर प्रशालेमध्ये इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप करण्यात आले.तसेच सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये पदोन्नतीने नियुक्त पर्यवेक्षक, नव्याने व बदलीने रूजू झालेल्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.व बदलीने इतर शाखेत गेलेल्या शिक्षकांना सन्मान करून निरोप देण्यात आला.यावेळी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज मधील शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांगोला विद्यामंदिरमध्ये केवळ शैक्षणिक गुणवत्तेलाच प्राधान्य दिले जाते.त्यामुळे पालकांनी ज्या अपेक्षेने आपल्या विद्यार्थ्यांना प्रवेशित केले आहे. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे.त्याचबरोबर सांगोला विद्यामंदिरमध्ये विद्यार्थी फक्त परीक्षार्थी होत नाही.इतर कौशल्याने विकसित होतो. त्यामुळेच इयत्ता दहावीमधील विद्यार्थिनीने आत्मविश्वासाने दहावी बोर्ड गुणाचे पुनर्मुल्यांकन केले व शंभर टक्के गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. ही प्रेरणा आपण सर्वांनी घ्यावी
प्रा.प्रबुद्धचंद्र झपके,अध्यक्ष,सां.ता.शि.प्र.मंडळ,सांगोला



