जवळा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये नवागतांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा.

जवळा(प्रशांत चव्हाण) कै. सौ. वत्सलादेवी देसाई विद्यालय व कै. अण्णासाहेब घुले- सरकार कनिष्ठ महाविद्यालय जवळा या प्रशालेमध्ये नवागतांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शैक्षणिक वर्ष 2025- 26 मध्ये इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर प्रशालेच्या शिक्षिका यांनी औक्षण करून व गुलाब पुष्प देऊन स्वागत स्वागत केले. प्रशालेच्या प्रवेशद्वारावर वर्गासमोर आकर्षक रांगोळी काढून फुगे लावून सजावट करण्यात आली होती. त्यानंतर नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, पाठ्यपुस्तक संच,वही पेन,पेन्सिल देऊन स्वागत करण्यात आले.तसेच मुलांना खाऊ म्हणून जिलेबी वाटण्यात आली.विद्यार्थ्यांच्या मनातही नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसाचे कुतूहल व जिज्ञासा निर्माण झाली आहे.विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मोठा उत्साह दिसून येत आहे.
यावेळी प्रशालेचे प्राचार्य श्री. बाळासाहेब शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांचे व नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत केले. आणि नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या तसेच या शैक्षणिक वर्षा प्रशालेमध्ये गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक ते सर्व उपक्रम राबविण्यात येतील विद्यार्थ्यांनी चालू शैक्षणिक वर्षात चिकाटीने व जिद्दीने अभ्यास करून उज्वल यश संपादन करावे असे प्राचार्य शिंदे सर यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले.सदर प्रसंगी प्राचार्य श्री.बाळासाहेब शिंदे सर,उपमुख्याध्यापक श्री.गोरे सर शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.



