सांगोला शहराच्या विकासासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर ; मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील

संपूर्ण सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण आणि समग्र विकासाची बांधिलकी मी स्वीकारली आहे. सांगोला शहरात १२ विकास कामांसाठी १० कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर झाला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिली.

सांगोला शहरातील अनेक वर्षांपासून रखडलेले सर्व प्रश्न आमदार शहाजीबापू पाटील व मी दोघे मिळून मार्गी लावू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही विकासकामे मार्गी लागणार असल्याने आबा बापूंच्या नेतृत्वाखाली सांगोला शहराचा कायापालट होऊ लागला आहे.

सांगोला शहरात नागरिकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या मागण्या लक्षात घेऊन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील व विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांनी शहरातील प्रलंबित विकास कामे पूर्ण करण्याची मागणी राज्याच्या नगर विकास विभागाकडे केली होती. यामध्ये शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नगर परिषदेचे खुले सभागृह बांधणे कामासाठी २ कोटी रुपये, होलार समाजासाठी नगरपरिषद क्षेत्रात समाज मंदिर व अभ्यासिका बांधणे या कामासाठी १ कोटी रुपये, मिरज रोड येथील नाभिक समाज मंदिर येथे पहिला मजला बांधण्याच्या कामासाठी ५० लाख रुपये, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ लादीकरण करणे कामासाठी २५ लाख रुपये, बुरुड समाजासाठी समाज मंदिर बांधणे कामासाठी ५० लाख रुपये, नगरपरिषद हद्दीतील चांडोलेवाडी शेंबडे वस्ती येथील अंतर्गत रस्ते विकसित करणे या कामासाठी १ कोटी ५० लाख रुपये, मोहन राऊत घर ते बायपास रस्त्यापर्यंत रस्ता खडीकरण व ओढ्यावर शिडी वर्क करणे या कामासाठी १ कोटी ७५ लाख रुपये, नगरपरिषद हद्दीतील पंढरपूर रोडवरील देशमुख वस्ती ते बाळासाहेब बनसोडे घर ते कॅनॉल लगत आप्पासाहेब देशमुख घर ते नगरपरिषद हद्दीपर्यंत रस्ता करणे या कामासाठी १ कोटी रुपये, जुना सावे रोड पैलवान मंगल कार्यालय तानाजी बिले घर ते मान नदीपर्यंत रस्ता करणे या कामासाठी ५० लाख रुपये, वाडेगाव रोड ते भाऊसाहेब पवार वस्तीपर्यंत रस्ता करणे या कामासाठी ५० लाख रुपये, चिंचोली रोड इन्नुस मुलानी वस्ती येथे रस्ता करणे या कामासाठी २५ लाख रुपये, एकतपुर रोड आरक्षण क्रमांक 63 अ येथील भाजी मंडई येथे लादीकरण या कामासाठी २५ लाख रुपये अशा एकूण १२ विकास कामांसाठी तब्बल १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

सांगोला नगरपरिषद हद्दीत मंजूर असणारी कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी शेवटी व्यक्त केला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button