कला कौशल्यांच्या वस्तू सादरीकरणातून शिक्षण सप्ताहाचा पाचवा दिवस साजरा

नाझरा(वार्ताहर):- शिक्षण हक्क कायदा 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने आज पाचव्या दिवशी विविध प्रकारच्या कला कौशल्याच्या वस्तू बनवणे व त्याचे सादरीकरण करण्याचा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये संपन्न झाला. मातीकाम,कागद काम,कापड काम, बांबू काम,नक्षीकाम त्याचबरोबर विविध प्रकारच्या कला कौशल्याचा वापर करून टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती विद्यार्थ्यांनी केली होती.
प्रशालेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले होते यावेळी प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी सदर प्रदर्शनाचा लाभ घेतला. सदर प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक बिभिषण माने,पर्यवेक्षक मधुकर धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक शिंदे प्रा. युवराज लोहार यांनी व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
विविध प्रकारच्या कला कौशल्यातून इयत्ता पाचवी ते सातवी गटातून मातीकाम मधून प्रथम क्रमांक अल्फाज फारूक काझी,कागद काम द्वितीय क्रमांक श्रीशैल्य दिगंबर चोथे, व कागदकाम मधून तृतीय क्रमांक मानसी नागनाथ बनसोडे तर आठवी ते दहावी गटातून कागदकाम मधून अमृता आदाटे प्रथम क्रमांक, बांबूकाम मधून अनन्या मल्हारी बनसोडे द्वितीय क्रमांक व कागदकाम मधून गौरी बाळासाहेब खळगे तृतीय क्रमांक असे पारितोषिक काढण्यात आले आहेत.
या प्रदर्शनातील विविध वस्तूंच्या परीक्षणासाठी कलाशिक्षक रावसाहेब बंडगर यांनी काम केले.
फोटो पाठवत आहे