न्यू इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षण सप्ताहातील कौशल्य व डिजीटल उपक्रम दिवस उत्साहात साजरा

सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि कॅालेज मध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २२ ते २८ जुलै या कालावधीमध्ये शिक्षण सप्ताह आयोजित करण्यात आलेला असून सप्ताहाचा पाचवा दिवस कौशल्य व डिजीटल उपक्रमाने साजरा करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपीठावर संस्थासचिव विठ्ठलराव शिंदे सर,प्राचार्य प्रा.केशव माने,उपमुख्याध्यापक प्रा.संजय शिंगाडे,पर्यवेक्षक तानाजी सूर्यगंध सर,दशरथ जाधव सर,तात्यासाहेब इमडे सर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रसिद्धीप्रमुख किरण पवार सर यांनी कौशल्य व डिजीटल उपक्रम दिवसाची माहिती सांगितली.पहिल्या सत्रामधे विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य,विक्री कौशल्य व मार्केटिंग कौशल्य वाढीस लागावे याकरिता प्रशालेमध्ये आठवडा बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. आठवडा बाजाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष व्यवहार करताना कोणती कौशल्य लागतात व ती कशी विकसित करावी लागतात हे समजले.
प्रशालेतील अधिकारी,शिक्षक,विद्यार्थी तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी आठवडा बाजारात खरेदीचा आनंद लुटला.या उपक्रमात प्रशालेतील इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थांनी सहभाग नोंदवला.दुपारच्या सत्रामध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थांचा डिजीटल उपक्रम पार पडला.या अंतर्गत डिजीटल क्लास रूम मध्ये प्रसिद्धीप्रमुख किरण पवार सर व अमोल पाकले सर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना अमोल पाकले सर म्हणाले की शालेय-श्रेणीचे शिक्षण असो किंवा व्यावसायिक शिक्षण असो, डिजिटल साधने आणि तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर कसा करायचा हे जाणून घेतल्यास आपले करिअर चांगले घडू शकते.अचूक, परस्परसंवादी, वेगवान, अधिक सोप्या संकल्पना आणि रोमांचक कार्यपद्धती हे काही सर्वोच्च फायदे डिजीटल युगाचे आहेत. प्रसिद्धीप्रमुख किरण पवार सर म्हणाले की,सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग असून आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटना आपल्याला प्रसार माध्यमांमुळे समजतात.आज मीडियाचा सर्वात मोठा स्रोत म्हणजे टेलीविजन.आज टीव्हीमध्ये मनोरंजन चॅनेल्स आहेत त्याइतकेच किंवा त्याहून अधिक बातम्या चे चॅनेल आहेत. देश आणि जगाच्या थेट बातम्या माध्यमांद्वारे उपलब्ध असतात. हे मीडिया लोक जगाच्या कोणत्याही कोप-यात घडणाऱ्या घटनेला त्वरित सर्वासमोर आणण्याचे काम करतात.
सदरच्या उपक्रमासाठी प्रशालेतील कोमल भंडारे मॅडम,दिनेश बागुल सर,अविनाश सरगर सर,अमोल पाकले सर,किरण पवार सर तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.