*गुणवत्ता व संस्काराच्या जडणघडणीसाठी विद्यामंदिर कटिबद्ध-प्राचार्य गायकवाड*

 सांगोला विद्यामंदिर हे विद्यार्थी संख्येबरोबर गुणवत्तावाढीत सुद्धा वेगाने पुढे जात असून विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या पालकांचे वेळोवेळी लाभणारे सहकार्य व मार्गदर्शनपर सूचना नेहमीच गुणवत्तावाढीला चालना देत असतात. पालकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकडे देखील कटाक्षाने लक्ष द्यावे तसेच सद्यस्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रत्येक हालचालीवरती पालकांची बारीक नजर असणे गरजेचे आहे असे मत सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे प्राचार्य अमोल गायकवाड यांनी इयत्ता नववीच्या शिक्षक पालक सहविचार सभेच्या अध्यक्षीय मनोगतातून मांडले.

सभेच्या सुरुवातीलाच आपल्या प्रास्ताविकातून पर्यवेक्षक सुरेश मस्तूद यांनी इयत्ता नववीच्या प्रथम घटक चाचणी परीक्षेचा निकाल सारांश रूपाने पालकांसमोर मांडत विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीमध्ये शिक्षकांबरोबरच पालकांची भूमिका देखील महत्त्वाची आहे असे सांगत पालकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या.

यावेळी राणी मदने, अमोल गायकवाड, पल्लवी अनपट, गौरी चंदनशिवे, शुभांगी सोडळ, तुकाराम इंगोले, शशिकला माळी, वर्षाराणी सुतार, विजयालक्ष्मी वस्त्रद, स्वाती कदम, मंदाकिनी लोखंडे या पालकांनी आपल्या पाल्याच्या गुणवत्तेसाठी प्रशालेकडून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करत सूचना मांडल्या.
यावेळी बहुसंख्येने पालक, इयत्ता नववीला अध्यापन करणारे सर्व शिक्षक उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन प्रशांत रायचुरे यांनी तर आभार गणेश हुंडेकरी यांनी मानले. सभेची सांगता चहापानाने झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button