शिवणे:- शिवणे येथील मुक्ताबाई रामभाऊ वाघमोडे यांचे शनिवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी 08:30 वाजता निधन झाले. निधना समयी त्यांचे वय 87 वर्ष होते.
त्या स्वर्गीय रामभाऊ काका वाघमोडे यांच्या पत्नी होत्या.
त्यांनी समाजकार्यात, राजकारणात, संस्था उभारणीत रामभाऊ काकांना खंबीर साथ दिली विनोबा भावे यांच्या भूदान चळवळ मध्ये रामभाऊकाका बरोबर सहभागी झाल्या होत्या. याशिवाय त्यांनी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग, डाळींब रोपवाटीका द्वारे मोफत रोपांचे वाटप केले, अनेक गरजुंना आर्थीक मदत करत स्त्रींयाचे संघटन केले. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्या कार्यरत राहिल्या. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी, नांतवडे असा मोठा परिवार आहे.त्यांचा तिसरा उद्या सोमवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता शिवणे येथील स्मशानभूमीत होणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.