गुरुवर्य बापूसाहेब झपके जिल्ह्यास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अनुष्का बिराजदार व ॠषी पैलवान प्रथम

सांगोला(प्रतिनिधी):- व्यक्ती यशोशिखरावर पोहोचतो हे त्याच्या नैसर्गिक अभ्यासाचे परिमाण असते. ही प्रगल्भता त्याला पुस्ताकाद्वारे मिळते. कारण पुस्तकातील शब्द हा जीर्ण होत चाललेल्या जीवनशक्तीला चैतन्याने न्हाऊ घालतो.म्हणून शब्दांबरोबर मैत्री व पुस्तकांबरोबर सलगी करा असे प्रतिपादन प्रा.तुकाराम मस्के यांनी केले‌.

सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या ४२ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, खजिनदार शंकर सावंत, संस्था कार्यकारणी सदस्य शीलाकाकी झपके,प्राचार्य गंगाधर घोंगडे, परीक्षक सुरेश पवार,सत्यवान दाढे, सोमनाथ गायकवाड, डॉ.सचिन लादे,शशिकांत कराळे, फारूख काझी, सुनील बनसोडे,रोहिणी भागवत- बुगड,वैजयंती देशपांडे,संगिता टकले उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा.मस्के म्हणाले स्पर्धेत नंबर येणे व वक्ता होणे याचा कसलाही संबंध नाही.स्पर्धक हा नेहमी स्पर्धक असतो.प्रत्येक स्पर्धेच्या विषयाची चांगली तयारी करा. उसन्या स्क्रिप्ट घेऊ नका असे सांगितले व प्रत्येक वेळी मी या स्पर्धेतून गुरूवर्य बापूसाहेबांची तत्वे व विचार घेऊन जातो असे सांगत या स्पर्धेच्या आयोजनाविषयी गौरवोद्गार काढले.

 

या स्पर्धेच्या सुरुवातीला कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके व तैलचित्रास परीक्षक,मान्यवर,स्पर्धक विद्यार्थी यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. व नंतर पात्रता फेरी व अंतिम फेरी या स्वरूपात ही स्पर्धा संपन्न झाली

.या स्पर्धेमध्ये ११ वी १२ गटामध्ये अनुष्का बिराजदार वालचंद कला व विज्ञान महाविद्यालय सोलापूर प्रथम क्रमांक,तनिषा आलदर कोळा विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज कोळा द्वितीय क्रमांक ,भारती मोटे विवेक वर्धिनी ज्युनिअर कॉलेज पंढरपूर तृतीय क्रमांक,स्नेहल कारंडे,विवेक वर्धिनी ज्युनिअर कॉलेज पंढरपूर चौथा क्रमांक, सृष्टी लिगाडे सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज सांगोला पाचवा क्रमांक व इ.८ वी ते १० वी गटामध्ये ऋषी पैलवान उत्कर्ष माध्यमिक विद्यालय सांगोला प्रथम,प्रणिती पवार पायोनिअर इंग्लिश मीडियम स्कूल य.मंगेवाडी द्वितीय क्रमांक,ऋतुजा शिंगाडे नाझरा विद्यामंदिर प्रशाला नाझरा तृतीय क्रमांक, वल्लभ गोडगे श्री.दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला सोलापूर चौथा क्रमांक,सारंगी वाघमोडे सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल सांगोला पाचवा क्रमांक असे यश संपादन केले‌. या यशस्वी विद्यार्थ्यांचा रोख रक्कम स्वरूपात बक्षिस,सन्मानपत्र व झपके कुटुंबीयांच्या वतीने देण्यात येणारे सन्मान चिन्ह प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष व परीक्षक यांचे हस्ते देऊन सन्मान करण्यात आला.

 

या कार्यक्रमासाठी सांगोला विद्यामंदिर परिवारातील प्रशासकीय अधिकारी, शिक्षक.शिक्षकेतर कर्मचारी, स्पर्धक विद्यार्थी,पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य गंगाधर घोंगडे यांनी केले.परीक्षक सत्कार निवेदन प्रा.धनाजी चव्हाण यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उन्मेश आटपाडीकर यांनी केले तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य शहिदा सय्यद यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button