शहराच्या विकासासाठी नागरी दलितेतर योजनेतून ५२ लाखाचा निधी मंजूर – आमदार शहाजीबापू पाटील; नगरपालिका हद्दीतील विविध भागात ३६९ नवीन इलेक्ट्रिक पोल व एक डिपी बसणार

सांगोला शहराच्या विविध भागात (४२ ठिकाणी) ३६९ रोड लाईटचे नवीन पोल उभे करून चिंचोली रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ नवीन डीपी उभाकरण्यासाठी नागरी दलितोतेतर सुधारणा योजनेतून ५२ लाख १५ हजार २३० रूपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे शहराच्या आजुबाजूस असणाऱ्या वाड्यावस्त्यांवर जाणारे रस्ते प्रकाशमय होणार असल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
सांगोला नगरपरिदेच्या हद्दीतील वाडीवसतीवर राहणाऱ्या नागरिकांनी अनेक दिवसांपासून रोड लाईटची आमदार शहाजीबापू पाटील यांच्याकडे मागणी केली होती.नगरपरिषद हद्दीतील नागरिकांची ही समस्या लक्षात घेवून दलितेतर सुधारणा योजनेतून ५२ लाखा १५ हजार २३० रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे आमदार अँड शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.या निधीतून पुढील प्रमाणे पोल उभा करण्यात येणार आहेत. संजय देशमुख (देशमुखवस्ती) येथे २, शुभम देशमुख घरासमोर २, भोकरे वस्ती लंबे घर ते तानाजी बिले घरापर्यंत ४,( कोपटे वस्ती) मधुकर पवार यांचे घरासमोर २, देशमुख वस्ती महादेव शिंदे ते रावसाहेब देशमुख घरापर्यंत ५,( साळुंखे वस्ती) मेजर साळुंखे घरापर्यंत १०, (भोकरे वस्ती) रस्त्यापासून संजय भोकरे घरापर्यंत १०, (देशमुख वस्ती) अर्जुन देशमुख घरापर्यंत ३, पुजारी घर ते कोपटे वस्ती २०, लिंगायत स्मशानभूमी ते जांगळे वस्ती २०, वाढेगांव रोड ते भाऊसाहेब पवार घरापर्यंत ७, माता बालक रोडवर नवीन वसाहतीत २०, खारवटवाडी येथे बेले घरापर्यंत १०, फॅबटेक कॉलेज ते चिंचोली रोड ४०, वाढेगांव रोड चिंदादेवी टेक ते जगताप घरापासून लिंगायत स्मशानभूमीपर्यंत १०, साळुंखे वस्ती रस्त्यापासून दत्ता साळुंखे,मेजर साळुंखे घरापर्यंत रोडलाईट करणे. तेली ताल ते भोकरे वस्ती पर्यंत १० पोल,कोपटेवस्ती ते नदीपर्यंत १०, जुना वाढेगांव रोड बंधन पॅलेस पासून माणनदीपर्यंत पोल टाकून स्ट्रीट लाईट जोडणे, सोपान जांगळे घर ते देविदास हुंडेकरी यांच्या घरापर्यंत ८ ,बंडू चौगुले घर ते जुना मेडशिंगी रोड ७,शिवाजीनगर १, (जांगळे वस्ती) अशोक जांगळे २, नंदकुमार चांडोले १, सोपान बिले(बिलेवस्ती) १, अकबर पठाण वासुद रोड १, बिटू मुलांनी (मुलांनीवस्ती) २, इनुस मुलांनी घारासमोर ५, पठाण सर (यशोजीवन हॉस्पिटल) ते कलढोने घर ९, पंढरपूर रोड पाण्याची टाकी ५, वाढेगांव रोड पाण्याची टाकी ७, बोगद्या जवळील पाण्याची टाकी १०,प्रतीक्षा माने ते प्रवीण खडतरे घर ५,निंबाळकर मॅडम घरापासून चव्हाण सर यांचे घरापर्यंत ५, एकतपुर रोड अँड चव्हाण यांचे घरापर्यंत ३, दत्तमंदिर पाठीमागे अरुण जगताप, दुधनी, इंगोले घरापर्यंत रोडलाईट,पाटील वस्ती कॅनल ते राजू गं.पाटील घरापर्यंत रोडलाईट, चांडोले वस्ती ते इंगोले वस्ती ५, खारवटवाडी स्टॉप ते इंगोले वस्ती २०, पारेरोड ते इंगोले वस्ती २०, रफिक तांबोळी घराजवळ ५ जुनामेडशिंगी रोड ते बुंजकर वस्ती पर्यंत ७, असे एकूण शहराच्या विविध भागात ३६९ नवीन इलेक्ट्रिक पोल उभा करून वीज जोडणीचे काम करण्यात येणार आहे. तसेच चिंचोली रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ नवीन डीपी बसवण्यात येणार आहे. वरील सर्व कामासाठी दलितोत्तर योजनेतून ५२ लाखांचा निधी मंजूर झाला असून लवकरच या कामाच्या निविदा काढल्या जातील. सदर पोल उभारणी करून वीज जोडणीचे काम तत्काळ पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे मत आमदार अँड शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले