महाराष्ट्र

शिवणे विद्यालयाच्या वतीने भागवत भाटेकर व शितल भाटेकर यांचा सत्कार  संपन्न

गुरुवार दिनांक 17/10/2024 शिवणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने जी. प्र. प्रा. शाळा शेळकेवाडी शिवणे येथील सहशिक्षक श्री. भागवत भाटेकर व शितल भाटेकर यांनी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत पुणे विभागात दुसरा क्रमांक मिळवला त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला
यावेळी प्रथम साने गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली शिवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. बबनराव जानकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
या सत्काराला उत्तर देताना भागवत भाटेकर गुरुजी म्हणाले की  याच शाळेत माझे प्राथमिक शिक्षण झाले असून माझ्याच गावात मला काम करण्याची संधी मिळाली 17 विद्यार्थी गुणवत्ता यादीत बसवले गावातील लोकांच्या  तसेच विद्यार्थी, पालक, गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्या सहकार्याने आम्ही हे यश मिळवले तसेच यावेळी शिवणे विद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी श्री मारुती सिद यांना सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा गुणवंत कर्मचारी हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला
तसेच प्राचार्य विजयकुमार वाघमोडे सर यांना महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघ सोलापूर यांच्याकडून गुणवंत शिक्षक हा पुरस्कार मिळाला याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला
यावेळी बोलताना प्राचार्य विजयकुमार वाघमोडे म्हणाले की आपल्याच गावातील जिल्हा परिषदेची शाळा महाराष्ट्राच्या नकाशावर आणण्याचे काम भाटेकर गुरुजींनी  केले पंधरा लाखाचे पारितोषिक मिळाले त्यांच्या कार्याचे व कष्टाचे मोल झाले त्यांनी नाव कमावले.
अध्यक्ष पदावरून बोलताना मा.बबनरावजी जानकर म्हणाले की भाटेकर गुरुजीचे काम मी जवळून पाहिले असून अत्यंत तळमळीने व प्रामाणिकपणे काम करणारा शिक्षक असून त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे त्यांनी आपल्या गावाचा नावलौकिक वाढवला आहे त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान असून पुढील वाटचालीस शुभेच्छा  दिल्या.
या कार्यक्रमाला शिवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक धनंजय घाडगे, अभिमान भाटेकर, सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री यशवंत नरळे सर यांनी केले तर आभार प्रा. मेटकरी मॅडम यांनी मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button